Dharmendra SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dharmendra : वयाच्या ८९ वर्षी देखील धर्मेंद्र जिममध्ये गाळत आहेत घाम, उत्साह अन् एनर्जी पाहून चाहते थक्क

Dharmendra Workout Video : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. ते सध्या आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहेत.

Shreya Maskar

आपल्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांच्या मनावर जादू करणारे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्रजी (Dharmendra ) आजही फिट आणि फाइन पाहायला मिळतात. सध्या ते आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना पाहायला मिळत आहे. त्यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओमध्ये धर्मेंद्र हे जिममध्ये वर्कआउट करताना पाहायला मिळत आहे.

अभिनेते धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या रीलवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. धर्मेंद्र वयाच्या 89 व्या वर्षी देखील जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. त्यांनी या व्हिडीओ एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "मित्रांनो, तुमचा मनोरंजन करण्यासाठी आणि तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी जन्माला आलो…. तुम्ही सर्व आनंदी निरोगी आणि स्ट्राँग रहा..."

धर्मेंद्र यांच्या व्हिडिओवर सेलिब्रिटी देखील कमेंट्स करत आहेत. यावर बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंहच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो म्हणाला की, "ओरिजिनल हे-मॅन!" तर चाहत्यांकडून त्यांना, जाट बलवान, पाजी तुस्सी ग्रेट हो अशा कमेंट्स मिळत आहे. व्हिडीओमधून त्यांनी चाहत्यांना एक संदेश देखील दिला आहे. त्यांनी सांगितले की, "मित्रांनो मी व्यायाम करायला सुरुवात केली आहे. मी फिजियोथेरेपी सुरू केली. मला पाहून तुम्ही खूश व्हाल अशी अशा करतो. मी खूप छान आहे."

वयाच्या 89 व्या वर्षी देखील धर्मेंद्र यांचा उत्साह आणि ऊर्जा पाहून चाहते थक्क झाले आहेत. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. अलिकडेच धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ते रेड कार्पेंटवर भन्नाट भांगडा डान्स करताना स्पॉट झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT