Amitabh Bachchan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan : 'फक्त अफवा...' ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्यावर अखेर बिग बींनी सोडलं मौन, नेमकं काय म्हणाले?

Amitabh Bachchan Talk On Aishwarya Abhishek Divorce: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर आपले मौन सोडलं आहे. नेमकं बिग बी काय बोलले जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूडचे स्टार बच्चन कुटुंब सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. मात्र यावर अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे.

अनेक वेळापासून ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबामध्ये दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण खूप वेळापासून हे कुटुंब एकत्र स्पॉट झाले नाही. बच्चन कुटुंब अनेक वेळा ऐश्वर्या राय शिवाय पाहायला मिळाले. तर ऐश्वर्या कायम आपल्या मुलीसोबत म्हणजे आराध्यासोबत स्पॉट होते. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहे. सध्या अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग चर्चेत आहे. ज्यात त्यांनी आपल्या कुटुंबाबद्दल भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या ब्लॉगवर एक खास नोट लिहिली. हा ब्लॉग गुरुवारचा आहे.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी लिहिलं की, "जीवनात वेगळे होण्यासाठी आत्मविश्वास आणि दृढ निश्चय लागतो. मी माझ्या कुटुंबाबद्दल खूप कमी बोलतो. कारण मला माझी प्रायव्हसी जपायला आवडते. बाकी सुरू असलेल्या या सर्व अफवा आहेत. " पुढे पत्रकारांना राग व्यक्त करत अमिताभ बच्चन म्हणाले की, "तुम्हाला हवं ते तुम्ही लिहा. कारण जेव्हा तुम्ही प्रश्नचिन्ह लावता तेव्हा तुम्हीच हे खोटं असू शकत हे सांगता. तुम्ही जगाला खोटं आणि शक्यता पूर्ण गोष्टी दाखवता. पण तुम्ही ज्यांच्या बाबत लिहिता त्यांच्या मनावर काय परिणाम होतो याचा कधी विचार केला का? " एकंदर असे बोलून अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर रंगलेल्या सर्व अफवा आहेत असे सांगितले आहे.

मात्र अद्यापही अमिताभ बच्चन यांनी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य केलं नाही आहे. एकीकडे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे अभिषेक बच्चनचे नाव निमृत कौरसोबत जोडले जात आहे. अशात स्वतः अमिताभ बच्चन निमृत कौरला पत्र लिहून तिच्या अभिनयाचे कौतुक देखील केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात एका संशयताला SIT ने घेतले ताब्यात

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

SCROLL FOR NEXT