Prakash Raj Mother Death news Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prakash Raj : प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचं ८६ व्या वर्षी निधन

Prakash Raj Mother Death news : प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या आई स्वर्णलता यांचे ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रकाश राज यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Alisha Khedekar

  • प्रकाश राज यांच्या आई स्वर्णलता यांचे ८६ व्या वर्षी निधन

  • प्रकाश राज यांच्यासाठी त्या सर्वात मोठी प्रेरणा होत्या

  • चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांकडून श्रद्धांजली

बॉलिवूड तसेच दाक्षिणात्या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या आईचे निधन झालं. त्या ८६ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारांनी त्रस्त होत्या. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रकाश राज यांच्या आईचे नाव स्वर्णलता असे आहे. प्रकाश यांच्या आईचा जन्म कर्नाटकात एका ख्रिश्चन कुटुंबात झाला होता, मात्र लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरपल्यामुळे त्याचं बालपण एका अनाथालयात गेलं होतं. त्यांनी परिचारिका म्हणून आपले शिक्षण पूर्ण केलं.

प्रकाश राज यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचे वडील दारूच्या आहारी गेले होते आणि त्यांच्या आईने एकटीनेच त्यांचा आणि संपूर्ण घराचा सांभाळ केला होता. ते आपल्या आईला आपली सर्वात मोठी प्रेरणा मानत असत आणि त्यांच्या आयुष्यावर तिचा खूप मोठा प्रभाव होता. आता त्यांच्या निधनाने प्रकाश राज यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रकाश राज यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी, तसेच बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करून स्वतःचे नाव कमावले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत पाच राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. गेल्या काही काळापासून ते त्यांच्या 'जना नायकन' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला झालेल्या विलंबामुळे चर्चेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील इळेगाव येथे पोलिसांवर वाळू माफियांचा हल्ला

फ्लॅटच्या 7/12 साठी लवकरच कायदा, फ्लॅटधारकांना आता डिजिटल प्रॉपर्टी कार्ड

SCROLL FOR NEXT