Siddhant Chaturvedi Instagram @siddhantchaturvedi
मनोरंजन बातम्या

Siddharth Chaturvedi: महिला फॅन्सच्या कृतीने आभिनेत्यालाही बसला धक्का; प्रमोशन इव्हेंटमध्ये घडलं....

आपल्या 'फोन भूत' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जेव्हा तो दिल्लीत आला तेव्हा अभिनेत्याला धक्काच बसला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Siddharth Chaturvedi: सेलिब्रिटी आणि चाहत्यांचे नाते एक वेगळेच नाते आहे. कधी चाहते आपल्या आवडत्या कलाकरांना भेटण्यासाठी आणि त्यांना खुश करण्यासाठी हवे ते करायला तयार असतात. तर बऱ्याचदा कलाकार आपल्या चाहत्यांना अचानक खास सरप्राईज देतात. बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, त्यांच्याकडे कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसतानाही बॉलिवूडमध्ये खास ओळख निर्माण केली आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे सिद्धार्थ चतुर्वेदी.

या नवख्या कलाकाराने फारच कमी वेळेत आपला ठसा चाहत्यांमध्ये पसरवला आहे. सिद्धांत चतुर्वेदीची फॅन फॉलोइंग त्याच्या उत्तम अभिनयामुळे वाढले आहेत. आपल्या 'फोन भूत' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जेव्हा तो दिल्लीत आला तेव्हा अभिनेत्याला धक्काच बसला. त्याला खरंच आश्चर्य वाटलं. शनिवारी हा अभिनेता दिल्लीतील एका कॉलेजमध्ये शेकडो महिला चाहत्यांनी घेरलेला दिसला. सध्या सिद्धांतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी एका कॉलेजमध्ये उभा आहे आणि काहीशा द्विधा अवस्थेत आहे. कारण महिला चाहत्या त्याला मोठमोठ्याने हाक देत आहेत आणि फोटोसाठी धडपड करत आहेत. अभिनेत्याचे सुरक्षारक्षक चाहत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. सिद्धांतच्या 'फोन भूत' या हॉरर-कॉमेडी चित्रपटात कतरिना कैफ आणि ईशान खट्टर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले असून मुख्य भूमिकेत जॅकी श्रॉफ, शीबा चढ्ढा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा एका भूतापासुन सुरु होते, पण तो भूत जेव्हा त्याचा हेतू प्रकट करतो त्यावेळी सर्वकाही बदलून जाते. चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच अभिनेत्याच्या खाजगी आयुष्याची देखील जोरदार चर्चा होत असते. नुकतेच काही दिवसांपुर्वी सिद्धांतने एका मुलाखतीत नव्याचं नं घेत म्हटले होते की, या गोष्टीत काहीही तथ्य नाही.

चित्रपटांबद्दल बोलायचे तर, सिद्धांत आगामी काळात 'खो गये हम कहाँ' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यात अनन्या पांडे आणि आदर्श गौरव देखील प्रमुख भूमिकेत आहेत. यापूर्वीही सिद्धांतने अनन्या पांडेसोबत 'गेहरायियां' या चित्रपटात काम केलं आहे. ज्यामध्ये दीपिका पादुकोणही मुख्य भूमिकेत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT