Sonu Nigam SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

Sonu Nigam With Fan : बॉलिवूड गायक सोनू निगमने आपल्या छोट्या चाहत्यासोबत 'ये दिल दीवाना...' हे गाणे गायले आणि चाहत्याचे खूप कौतुक केले आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगम (Sonu Nigam) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याने आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. त्याने आजवर अनेक हिट गाणी दिली आहेत. सोनूचा मोठा चाहता वर्ग आहे.

नुकताच सोनू आपल्या एका छोट्या चाहत्याला भेटला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोनू निगम एका त्याच्या छोट्या चाहत्याला भेटला आहे. सोनूने त्या छोट्या चाहत्याचे भरपूर कौतुक देखील केले आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता की, सोनू निगम एका कार्यक्रमातून निघाला असता त्याला आपल्या गाडीजवळ त्याचा एक चाहता भेटतो. हा छोटा चाहता सोनू निगमसमोर दमदार 'बीट बॉक्सिंग' करतो. जे सोनू निगमला खूप आवडते. तो त्या छोट्या चाहत्याचे खूप कौतुक करतो.

तसेच सोनू चाहत्यासोबत बीट बॉक्सिंगच्या ठेक्यावर 'ये दिल दीवाना...' हे गाणे गातो. तसेच शेवटी जाताना तो छोट्या मुलाच्या गालावरून हात देखील फिरवतो. तो स्वतः त्या मुलाला विचारतो की , "मी तुझ्यासाठी कोणते गाणे गाऊ?" त्यावर चाहता बोलतो, "कोणतही गाणं चालेले" मग सोनू 'ये दिल' गाणे गाऊ लागतात. सोनूच्या चाहत्यासोबतच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सर्वजण सोनू निगमच्या कृतीचे कौतुक करत आहेत.

नुकतेच सोनू निगमने 'भूल भुलैया ३' मध्ये 'मेरे ढोलना ३.०' हे गाणे गायले आहे. चाहत्यांना हे गाणे भरपूर आवडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

SCROLL FOR NEXT