Raj Kundra Cried Saam Tv
मनोरंजन बातम्या

UT 69 Trailer Out: अखेर 2 वर्षांनंतर राज कुंद्राने काढला मास्क, 'यूटी 69'च्या ट्रेलर लॉन्चवेळी ढसाढसा रडला; VIDEO व्हायरल

Raj Kundra Cried : एए फिल्म्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शाहनवाज अली यांनी केले आहे.

Priya More

Raj Kundra Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) नवरा राज कुंद्राच्या (Raj Kundra) जीवनावर आणि त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या घटनांवर आधारित 'UT 69' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.

विशेष म्हणजे या चित्रपटात स्वत: राज कुंद्राने त्याची भूमिका साकारली आहे. एए फिल्म्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शाहनवाज अली यांनी केले आहे. या ट्रेलर लॉन्च वेळी राज कुंद्रा मीडियाशी संवाद साधताना ढसाढसा रडला.

तुरुंगातून बाहेर आल्यापासून राज कुंद्रा आपला चेहरा लपवत आहे. तो नेहमी चेहऱ्यावर मास् लावूनच घराबाहेर पडताना दिसला आहे. २० सप्टेंबर २०२१ रोजी कोर्टाने राज कुंद्राला जामीन मंजूर केला. त्यानंतर तो आर्थर रोड जेलमधून बाहेर आला. त्यानंतर तो नेहमी मास्क लावूनच सगळीकडे स्पॉट झाला आहे. आता २ वर्ष, २७ दिवस आणि १४ तासांनंतर राज कुंद्राने चेहऱ्यावरील मास्क काढून टाकले. आपल्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळी राज कुंद्राने चेहऱ्यावरील मास्क काढले. यावेळी मीडियासमोर तो ढसाढसा रडू लागला.

UT 69 च्या ट्रेलर लॉन्चवेळी माध्यमांशी संवाद साधताना राज कुंद्राला रडू आवरता आले नाही. यावेळी त्याने तब्बल दोन वर्षांनंतर चेहऱ्यावरील मास्क काढून या चित्रपटाशी संबंधित आपल्या आठवणी माध्यमांसोबत शेअर केल्या. यादरम्यान त्याने खुलासा केला की, 'त्याने चित्रपटाचा प्रत्येक शॉट मनापासून शूट केला आहे आणि म्हणूनच जिथे रडणारा सीन असेल तिथे त्याला ग्लिसरीनचीही गरज भासली नाही. त्यांनी त्या दृश्याचा उल्लेखही केला.'

कुटुंबीयांविषयी बोलताना राज कुंद्रा आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि ढसाढसा रडू लागला. तो म्हणाला, 'तुम्हाला जे पाहिजे ते बोल, पण माझी मुलं, माझी पत्नी आणि माझ्या कुटुंबावर जाऊ नका यार, त्यांनी तुमचे काय नुकसान केले आहे?' दरम्यान, राज कुंद्राचा 'UT 69' हा चित्रपट 3 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'UT 69' हा राज कुंद्राचा बायोपिक आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राज कुंद्रावर अॅडल्ट चित्रपट बनवण्याचे आरोप आणि त्यानंतर तुरुंगात घालवलेल्या आयुष्याची झलक दाखवण्यात आली आहे. अॅडल्ट फिल्म बनवण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा तुरुंगात कसा जातो आणि त्यानंतर तेथील पोलीस आणि कैद्यांकडून त्याला कशी वागणूक मिळते हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. पोलिस त्याला नग्न करतात आणि कैद्यांना विश्वास बसत नाही की तो खरोखर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आहे.

शिल्पा शेट्टीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पतीच्या बायोपिकचा ट्रेलर शेअर केला आहे. यासोबतच तिने कॅप्शनही लिहिले आहे की, 'ऑल द बेस्ट, कुकी. तुम्ही एक धाडसी व्यक्ती आहात. मला तुमच्याबद्दल सर्वात जास्त कौतुक वाटते! हे आहे तुमचे धैर्य आणि सकारात्मकता!' सध्या राज कुंद्राच्या या चित्रपटाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

SCROLL FOR NEXT