Shahid Kapoor Kriti Sanon Movie Saam TV
मनोरंजन बातम्या

New Movie Poster : शाहिद-क्रितीच्या नव्या रोमँटिक सिनेमाचं पोस्टर आलं समोर, रिलीज डेटही ठरली; फॅन्स मात्र वेगळ्याच कारणाने लागले कामाला

Shahid Kapoor Kriti Sanon Movie : निर्मात्यांनी या रोमँटिक चित्रपटाची रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bollywood News : अभिनेता शाहिद कपूर त्याच्या ब्लडी डॅडी सिनेमामुळे सध्या चर्चेत आहे. तर क्रिती सेननने आदिपुरुष सिनेमात साकारलेल्या सीतेच्या भूमिकेचं कौतूक होत आहे. सध्या चर्चेत असलेले दोन्ही कलाकार आता एका नव्या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. जियो सिनेमावर येणाऱ्या चित्रपटात ही जोडी दिसेल.

शाहिद आणि क्रिती स्टारर या नव्या सिनेमाचं पोस्टर आज रिलीज झालं आहे. मात्र सिनेमाचं नाव लोक या पोस्टरवर शोधत आहे. त्यामुळे फॅन्सना आता सिनेमाचं नाव शोधण्याचं काम लागलं आहे. कारण सिनेमाचं नाव पोस्टरवर कुठेही दिसत नाही. चित्रपटाचं टायटल अजून तरी ठरलेले नाही. परंतु निर्मात्यांनी या रोमँटिक चित्रपटाची रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

जिओ स्टुडिओने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे पोस्टर शेअर केलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शाहिद कपूर आणि क्रिती सूर्यास्तावेळी समुद्रकिनारी बाइकवर बसून रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. शाहिद आणि क्रितीची जोडी ऑनस्क्रीन पाहण्यासाठी आता प्रेक्षक आतूर झाले आहेत.  (Latest Entertainment Movie)

यावर्षी 7 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. जिओ स्टुडिओजवर हा चित्रपट पाहता येणार आहे. अमित जोशी आणि आराधना साह यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर दिनेश विजन, ज्योती देशपांडे, लक्ष्मण उतेकर यांची या सिनेमाची निर्मिती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार ₹३०००; सरकारने उचललं मोठं पाऊल

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Municipal Election : प्रचार संपण्याआधीच भाजपला जोरदार धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT