shah rukh khan fans brurst crackers outside theaters Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dunki Movie: 'किंग खान'चे जबरा फॅन्स, 'डंकी' पाहून चित्रपटगृहात डान्स तर बाहेर फटाक्यांची आतिषबाजी

Priya More

Dunki Movie Released:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुप्रतीक्षित चित्रपट 'डंकी' आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. डंकी चित्रपट (Dunki Movie) पाहण्यासाठी शाहरुखच्या चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी केली आहे. सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी चित्रपटगृहामध्ये स्क्रिनसमोर 'लुट पुट गया' या गाण्यावर शाहरुख खानसोबत डान्स केला. ऐवढंच नाही तर अनेकांनी थिएटरबाहेर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

'डंकी' रिलीज झाल्यानंतर शाहरुख खानचे चाहते वेडे झाले असून त्याची झलक सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. शाहरुख खानच्या 'जवान' आणि 'पठान'च्या वेळी त्याच्या चाहत्यांमध्ये जो उत्साह होता. तोच उत्साह त्याचा डंकी चित्रपट पाहाताना देखील चाहत्यांमध्ये दिसून आला आहे. चाहत्यांनी अक्षरश: चित्रपटगृह हादरवून सोडले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटगृहामध्ये एकच जल्लोष केला. काहिंनी बसल्याच ठिकाणी तर काहींनी चित्रपटगृहातील स्क्रिनसमोर शाहरुख खानचे 'लुट पुट गया' हे गाणं लागताच डान्स केला.

तर दुसरीकडे, अनेक ठिकाणी शाहरुख खानच्या चाहत्यांनी पहिला शो पाहिल्यानंतर चित्रपटगृहाबाहेर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली आणि डान्स केला. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा चित्रपट पाहून शाहरुखचे चाहते त्याचे आणखी जबरा फॅन झाले आहेत. या चाहत्यांमध्ये डंकीची किती क्रेझ आहे हे या व्हिडीओवरून दिसून येत आहे. त्याचसोबत चित्रपट पाहिल्यानंतर शाहरुखचे चाहते सोशल मीडियावर आपले मत मांडताना दिसत आहेत. त्यांनी शाहरुख खानसोबत सर्वांच्या अभिनयाचे खूपच कौतुक केले आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी मिळणारा प्रतिसाद पाहून हा चित्रपट देखील सुपरहिट ठरेल असे दिसून येत आहे.

दरम्यान, शाहरुख खानच्या 'डिंकी' चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी पहिल्यांदाच 'डिंकी' चित्रपटात एकत्र काम करत आहेत. महत्वाचे म्हणजे डंकी हा शाहरुख खानचा 2023 मधील तिसरा चित्रपट आहे. याआधी शाहरुख खानचा 'पठान' आणि 'जवान' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिससोबत वर्ल्डवाइड जबरदस्त कमाई केली. आता शाहरुख खानसह निर्मात्यांना देखील डंकी सुपरहिट ठरून चांगली कमाई करावा ही अपेक्षा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT