Murder Mubarak Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Murder Mubarak Trailer: सारा अली खानच्या 'मर्डर मुबारक'चा सस्पेंसने भरलेला ट्रेलर आऊट, पंकज त्रिपाठी घेणार खुन्याचा शोध

Murder Mubarak Trailer Released: या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरवरून हे स्पष्ट दिसत आहे की हा चित्रपट सस्पेंस आणि थ्रिलरने परिपूर्ण आहे.

Priya More

Murder Mubarak Movie:

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan), करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) स्टारर 'मर्डर मुबारक' चित्रपट (Murder Mubarak Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरवरून हे स्पष्ट दिसत आहे की हा चित्रपट सस्पेंस आणि थ्रिलरने परिपूर्ण आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच चित्रपटातील वेगवेगळ्या पात्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यानंतर एक खून होतो आणि संशयाचा खेळ सुरू होतो. जो 7 संशयितांभोवती फिरतो. ही कथा रॉयल दिल्ली क्लबमध्ये झालेल्या एका खुनाची आहे. ज्याचा तपास एसीपी भवानी सिंग यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या संपूर्ण चित्रपटात पंकज त्रिपाठीची व्यक्तिरेखा अतिशय दमदार आहे. तो या केस आणि पात्रांशी संघर्ष करत राहतो.

प्रत्येक पात्राभोवती संशयाची सुई एकामागून एक फिरत असते. विशेषत: डिंपल कपाडिया, सारा अली खान आणि करिश्मा कपूर यांच्या पात्रांवर संशय अधिक गडद होताना दिसत आहे. ट्रेलरच्या शेवटी एक मिनिटासाठी असे दिसते की करिश्मा कपूरच्या पात्राने हा खून केला आहे. परंतु नंतर असे दिसून येते की ती फक्त चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

हा चित्रपट एका आधुनिक आणि श्रीमंत कुटुंबाची कथा आहे. जे इंग्रजीपेक्षा जास्त इंग्रजी बोलतात. या चित्रपटात ॲक्शन, गोळ्या, रक्तपात आणि रोमान्सचा संपूर्ण डोस आहे. ट्रेलरमधील सारा आणि विजयच्या रोमान्स आणि इंटिमेट सीन्सनेही बरीच चर्चा केली आहे.

पंकज त्रिपाठी सारा अली खान, विजय वर्मा, डिंपल कपाडिया, करिश्मा कपूर, संजय कपूर, टिस्का चोप्रा, करिश्मा कपूर आणि सुहेल नय्यर हे कलाकार मर्डर मुबारक चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 15 मार्चपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुता आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून ही उत्सुकता आणखी वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT