Tiger 3 New Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3 Advance Booking: 'टायगर ३'चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग कधीपासून सुरू होणार?, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सलमान खान सज्ज

Priya More

Tiger 3 Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या बहुप्रतीक्षित 'टायगर 3' चित्रपटामुळे (Tiger 3 Movie) चर्चेत आहे. या चित्रपटाची सलमान खानचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढच्या महिन्यात १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मागच्या आठवड्यापासून या चित्रपटाच्या तिकीटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर अॅडव्हान्स बुकिंगला (Tiger 3 Advance Booking) सुरूवात झाली होती. या चित्रपटाच्या तिकीटाचे आतापर्यंत झालेल्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगवरून असा अंदाज लावला जात आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल.

'टायगर 3' चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. सलमान खान, कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मीव्यतिरिक्त या चित्रपटात रिद्धी डोगरा, कुमुद मिश्रा, रेवती आणि अनंत विदत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. 'टायगर ३' चित्रपटाची परदेशात चांगलीच चर्चा होत आहे. अशामध्ये या चित्रपटाची भारतामध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंग कधीपासून सुरू होणार हे आपण जाणून घेणार आहोत.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला 'टायगर 3' चित्रपटाची तिकीटे आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रीला सुरूवात झाली होती. पुढच्या महिन्याच्या १२ तारखेला चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा मोठ्या ओपनिंगचा अंदाज वर्तवणारे सुरुवातीचे प्री-सेल ट्रेंड खूप प्रभावी आहेत. सलमान खानच्या चित्रपटाने रिलीज होण्याच्या १३ दिवस आधीच १,५०,००० अमेरिकी डॉलरच्या तिकीटांची विक्री केली आहे. विक्रीच्या बाबतीत, शाहरुख खानचे दोन चित्रपट 'जवान' आणि 'पठाण'ने यावर्षी परदेशी बॉक्स ऑफिसला अनपेक्षित उंचीवर नेले आहे.

'टायगर ३' चित्रपटाचे भारतामध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंग कधीपासून सुरू होणार याची माहिती ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. टायगर 3' चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. आगाऊ बुकिंगवरूनच हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कलेक्शन करू शकतो याचा अंदाज येऊ शकतो. सलमान खानचा टायगर 3 'जवान' चित्रपटाचा विक्रम मोडू शकेल का? हे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समोर येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

Marathi News Live Updates : काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता येते ती राज्य उध्वस्त होतात, नरेंद्र मोदी

Fashion Tips : बॅगी जीन्ससोबत ट्राय करा 'हे' टॉप्स, फॅशन ट्रेंडमध्ये दिसाल स्टायलिश!

SCROLL FOR NEXT