Tiger 3  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan On Tiger 3: 'टायगर ३'च्या रिलीजनंतर पहिल्यांदाच बोलला सलमान खान, चाहत्यांचे मानले आभार

Priya More

Tiger 3 Box Office Collection:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतीक्षित चित्रपट 'टायगर 3' (Tiger 3 Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 12 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. हा चित्रपट म्हणजे सलमान खानच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरला आहे. सलमानचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी थिएटरबाहेर मोठी गर्दी करत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.

या चित्रपटाने वर्ल्डवाइड ४०० कोटींची कमाई केली आहे. 'टायगर 3' हा हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा दिवाळी हिट चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या यशावर स्वत: सलमान खानने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सलमान खानने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये 'टायगर ३' च्या यशाबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला की, 'टायगरचे आतापर्यंत तीन चित्रपट आले आहेत. ज्यामध्ये यशाची कहाणी दाखवण्यात आल्या आहेत. टायगर फ्रेंचाइजी माझ्या हृदयात राहते आणि मला आनंद आहे की आमच्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयातही स्थान निर्माण केले आहे.'

सलमान खान म्हणतो की, 'टायगर फ्रँचायझी हा माझ्या आवडत्या ब्रँडपैकी एक आहे. मला विश्वास आहे की ती माझी फिल्मोग्राफी नेहमीच चमकत राहील. जेव्हा मी पहिला टायगर चित्रपट करत होता तेव्हा मला माहित नव्हते की त्याचा सीक्वलही बनणार आहे. पण आता आमच्याकडे टायगरचे तीन चित्रपट आहेत.'

'आता 2012 पासून जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी स्वतःची फ्रेंचायझी आहे. कोणत्याही चित्रपटाच्या किंवा फ्रँचायझीच्या यशाचा पुरावा त्याद्वारे लिहिलेल्या कथेमध्ये असतो.', असे देखील त्याने स्पष्टपणे सांगितले. सलमान खान पुढे म्हणाला, 'मला वाटते की टायगर फ्रेंचाइजीने प्रेक्षकांना एक देसी गुप्तहेर दिला आहे. ज्यावर लोकांनी खूप प्रेम केले आहे. मी टायगर जगलो आहे आणि प्रेक्षकांनी माझ्या चित्रपटांना दिलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांचे आभार मानतो.'

दरम्यान, 'टायगर' ३ हा चित्रपट सध्या तिन्ही भाषांमध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये रिलीज झाला आहे. तिन्ही भाषांमध्ये प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान व्यतिरिक्त कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

200MP कॅमेरा, 12 जीबी रॅम; 12000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा हा जबरदस्त फोन, जाणून घ्या किंमत

AC Disadvantages : २४ तास AC मध्ये असता? वाचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Astrology: ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक असतात भाग्यवान, तुमचा बर्थडे कधी?

October Heat: ऑक्टोबर हिटमध्ये अशी घ्या आरोग्याची काळजी

Marathi News Live Updates : पुणे बोपदेव घाट बलात्कार प्रकरण : पोलिसांकडून १०० पेक्षा अधिक संशियतांची चौकशी सुरु

SCROLL FOR NEXT