Swatantrya Veer Savarkar Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swatantrya Veer Savarkar Twitter Review: रणदीप हुड्डाच्या मेहनतीचं होतंय कौतुक, प्रेक्षकांना फर्स्ट डे फर्स्ट शो कसा वाटला?

Randeep Hooda And Ankita Lokhande: या चित्रपटात रणदीप हुड्डाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका देखील साकारली आहे. अंकिता लोखंडेने या चित्रपटामध्ये यमुनाबाई सावरकरांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी दोघांचेही चाहते चित्रपटगृहाबाहेर गर्दी करत आहे.

Priya More

Swatantrya Veer Savarkar Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar Movie) हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटासाठी दोघांचे चाहते खूपच उत्सुक होते. ते या चित्रपटाच्या रिलीज होण्याची वाट पाहत होते. अखेर आज त्यांची प्रतीक्षा संपली. या चित्रपटाची सर्व धुरा रणदीप हुड्डाने सांभाळली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही रणदीप हुड्डाने केले आहे.

या चित्रपटात रणदीप हुड्डाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका देखील साकारली आहे. अंकिता लोखंडेने या चित्रपटामध्ये यमुनाबाई सावरकरांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी दोघांचेही चाहते चित्रपटगृहाबाहेर गर्दी करत आहे. या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने घेतलेल्या मेहनतीचे खूपच कौतुक होत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला, फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर काय मत मांडले आहे ते आपण पाहणार आहोत...

'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक रणदीप हुड्डाचे कौतुक करत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांनी समिश्र प्रतिसाद दिला आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, 'वीर सावरकरांची भूमिका साकारण्यासाठी रणदीप हुड्डाला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा...त्याने काहीच गोष्टी सोडल्या नाहीत.' दुसऱ्या यूजरने लिहिले की,'मी हा सुपरहिट चित्रपट पाहिला. किती छान चित्रपट आहे. खूप आवडला.' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाचा प्रीमियर शो पाहिला. रणदीप हुड्डने किती अप्रतिम प्रयत्न केले आहेत. तरुणांनी आणि समीक्षकांनी हा चित्रपट जरूर पहावा.'

'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटात रणदीप हुडाचा अप्रतिम अभिनय आणि दिग्दर्शन पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये रणदीपसोबत अंकिता लोखंडेनेही तिची व्यक्तिरेखा अतिशय चोख बजावली आहे. रणदीप, अंकितासोबतच या चित्रपटामध्ये अमित साई, आर भक्तीसह अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती रणदीप हुड्डानेच केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT