Animal Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Animal Collection day 13: वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये 'अ‍ॅनिमल'ने मारली बाजी, ८०० कोटींचा आकडा पार करण्यासाठी इतके अंतर दूर

Animal Worldwide Collection day 13: फक्त बॉक्स ऑफिसच नाही तर जगभरामध्ये हा चित्रपट जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या कमाईचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून एक-एक रेकॉर्ड ब्रेक करत आहे.

Priya More

Animal Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि बॉबी देओलचा (Bobey Deol) 'अ‍ॅनिमल' (Animal Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. १३ व्या दिवशी देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

फक्त बॉक्स ऑफिसच नाही तर जगभरामध्ये हा चित्रपट जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या कमाईचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून एक-एक रेकॉर्ड ब्रेक करत आहे. १३ दिवसांत या चित्रपटाने ७५० कोटींपार कलेक्शन केले आहे. ८०० कोटींच्या क्लबमध्ये पोहचण्यासाठी हा चित्रपट अवघे काही आकडे दूर आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'अ‍ॅनिमल' चित्रपट इतर चित्रपटांना मागे टाकत दमदार कमाई करताना दिसत आहे. भारतामध्ये हा चित्रपट ५०० कोटींच्या क्लबमध्ये पोहचण्यासाठी अवघे काही अंतर दूर आहे. १३ व्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईचा आकडा इतर दिवशीच्या कमाईपेक्षा खूपच कमी आहे. १३ व्या दिवशी या चित्रपटाने १९.४२ कोटींची कमाई केली. आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने एकूण ४६८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

तर वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये देखील 'अ‍ॅनिमल'ची जादू कायम पाहायला मिळत आहे. वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये ७५० कोटीचा आकडा पार करण्यास चित्रपटाला यश आले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ७७२. ३३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. वर्ल्डवाइड कलेक्शनच्या बाबतीत हा चित्रपट दिवसेंदिवस नवा आश्चर्यकारक आकडा पार करताना दिसत आहे.

संदीप रेड्डी वंगा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाला अजूनही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूरसह, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी आहेत. सर्वच कलाकारांच्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. चित्रपटाची निर्मिती जवळपास १०० कोटींमध्ये झालेली असून पहिल्या दोन दिवसांच्या कमाईतूनच निर्मितीचा खर्च वसूल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : दारूसाठी पैसे दिले नाहीत, शेजारी संतापला, डोक्यात कुऱ्हाड घालून केली हत्या

Maharashtra Politics: दिवाळीत ठाकरेंनी बॉम्ब फोडला, नाशिकमध्ये भाजपला धक्का; २ दिग्गज देते 'मशाल' पेटवणार

Gold Buying: धनत्रयोदशीला सोने खरेदीचा विक्रम; एकाच दिवशी 1 लाख कोटींची खरेदी

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS: 7 महिन्यांनंतर RO-KO मैदानात; ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडेसाठी कुलदीप OUT हर्षित IN

SCROLL FOR NEXT