Raha Kapoor Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raha Kapoor Video: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये रणबीर-आलियापेक्षा मुलगी राहाचीच चर्चा, क्युटनेसने जिंकलं सर्वांचं मन

Raha Kapoor Cute Video: राहा कपूर तिच्या जन्मापासूनच लाइमलाइटचा भाग आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर आलिया आणि रणबीरने आपल्या लाडक्या मुलीची म्हणजे राहाची झलक जगाला करून दिली. राहाचा चेहरा त्यांनी संपूर्ण जगाचा दाखवला होता.

Priya More

Anant Ambani And Radhika Merchant Pre Wedding:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि त्यांची मुलगी राहा (Raha Kapoor) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. हे कपल अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी झाले. या फंक्शनमध्ये आलिया आणि रणबीरपेक्षा त्यांची मुलगी राहानेच सर्वात जास्त लाइमलाइट खाल्लं. राहाचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत व्हायरल झाले आहेत. नुकताच राहाचा आणखी एक क्युट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती पप्पा रणबीर कपूरसोबत दिसली. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला असून तुफान व्हायरल होत आहे.

राहा कपूर तिच्या जन्मापासूनच लाइमलाइटचा भाग आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर आलिया आणि रणबीरने आपल्या लाडक्या मुलीची म्हणजे राहाची झलक जगाला करून दिली. राहाचा चेहरा त्यांनी संपूर्ण जगाचा दाखवला होता. हे कपल क्वचितच आपल्या मुलीला मीडियासमोर आणत असते. जेव्हा-जेव्हा राहाचा फोटो आणि व्हिडीओ समोर येतो. तेव्हा तो तुफान व्हायरल होतोच.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये सहभागी झाले. या ठिकाणी हे कपल आपल्या मुलीसोबत अधिकाधिक वेळ घालवताना दिसले. या लग्नामध्ये क्युट राहाचीच सगळीकडे चर्चा होती. आता राहाचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये ती पप्पा रणबीरसोबत दिसली. रणबीरने राहाला कडेवर घेतलं होतं.

हा व्हिडिओ अनंत-राधिकाच्या प्री-वेडींग फंक्शनमधील रविवारीचा आहे. रणबीर आणि राहाने एकसारख्याच रंगाची ड्रेसिंग केली होती. रणबीरने पांढऱ्या रंगाचा शर्ट-पँट आणि त्यावर ग्रे कलरचे जॅकेट परिधान केले होते. तर राहाने पांढऱ्या रंगाची सुंदर फ्रॉक परिधान केली होती. तसंच दोन पोनीटेल अशी तिची हेअरस्टाइल करण्यात आली होती. राहा या लूकमध्ये नेहमीप्रमाणे खूपच क्युट दिसत होती. यावेळी ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

अशातच राहाच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रणबीर राहाला अभिषेक बच्चन आणि आणखी एका महिलेची ओळख करून देतोय. त्यावेळी अभिषेक बच्चन राहाच्या गालाला हात लावतो. त्यामुळे राहा घाबरते आणि ती रणबीरला घट्ट मिठी मारते. त्यानंतर रणबीर राहाच्या गालाला किस करतो. राहाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये रणबीर-आलियापेक्षा त्यांची मुलगी राहाचीच जास्त चर्चा झाली.

याआधीही राहाचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये अयान मुखर्जी, रणबीर आणि आलिया राहासोबत बागेत मस्ती करताना दिसले होते. आलियाने नेकलाइन बॉर्डरसह निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर रणबीर नेव्ही ब्लू कलरच्या शर्टमध्ये दिसला. अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने ब्रह्मास्त्रमधील 'केसरिया' गाण्यावर डान्स केला. यावेळी आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका मेहता या जोडप्याला सपोर्ट करताना दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT