Rakul Preet Singh And Jackky Bhagnani Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakul-Jackky Wedding: रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरूवात, अभिनेत्रीचा क्युट VIDEO व्हायरल

Rakul Preet Singh Video Viral: गुरुवारी संध्याकाळपासून या कपलच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरूवात झाली आहे. प्री-वेडिंग फक्शनसाठी रकुल प्रीत नटून थटून गुरुवारी संध्याकाळी आपल्या कुटुंबीयांसोबत होणारा नवरा जॅकी भगनानीच्या घरी आली होती.

Priya More

Rakul Preet Singh And Jackky Bhagnani:

बी-टाउनमधील सर्वांचे आवडते कपल म्हणजे अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) लवकरच विवाहबंधनात अडणार आहेत. सध्या त्यांच्या लग्नाची (Rajul-Jackky Wedding) जोरदार चर्चा होत आहे. रकुल प्रीत सिंग येत्या २१ फेब्रुवारीला गोव्यामध्ये जॅकी भगनानीसोबत (jackky bhagnani) लग्न करणार आहे. दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. दोघांच्याही घरी लग्नानिमित्त आकर्षक लाइटिंग करण्यात आली आहे.

अशामध्ये गुरुवारी संध्याकाळपासून या कपलच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरूवात झाली आहे. प्री-वेडिंग फक्शनसाठी रकुल प्रीत नटून थटून गुरुवारी संध्याकाळी आपल्या कुटुंबीयांसोबत होणारा नवरा जॅकी भगनानीच्या घरी आली होती. पापाराझींनी रकुल प्रीतला तिच्या कुटुंबीयांसोबत जॅकीच्या घरी जाताना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले. रकुलचा क्युट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पापाराझीने गुरुवारी संध्याकाळी रकुल प्रीत सिंगला तिच्या कुटुंबासह जॅकी भगनानीच्या घराबाहेर स्पॉट केले. यावेळीचा रकुलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रकुल प्रीत सिंग आपल्या कारमधून उतरून जॅकीच्या घराच्या दिशेने जात आहे. यावेळी रुकल प्रीत खूपच सुंदर दिसत होती. ब्लॅक कलरचा ड्रेस आणि त्यावर हिऱ्यांचे चोकर नेकलेस घातले होते. जॅकीची बायको होणाऱ्या रकुल प्रीतच्या चेहऱ्यावरील ग्लो दिसत आहे.

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी गोव्यातील मित्र परिवार आणि कुटुंबीयांमध्ये इको-फ्रेंडली लग्न करणार आहेत. 19 फेब्रुवारीपासून त्यांच्या लग्नसोहळ्याच्या विधींना सुरूवात होणार आहे. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा 21 फेब्रुवारीला पारंपारिक विवाह होणार आहे. रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांचे नात्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. यानंतर हे जोडपे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसू लागले.

दरम्यान, ई टाइम्सच्या वृत्तानुसार, रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी हे लग्नानंतर हनीमूनला जाणार नाहीत. अभिनेत्री तिच्या लग्नाच्या ३ दिवस आधीपर्यंत काम करणार आहे आणि लग्नाच्या सुमारे एक आठवड्यानंतर ती एका नवीन बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मात्र, त्या चित्रपटात तिचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. पण ती या चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा होत आहे. तर जॅकी भगनानी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या 'बडे मियाँ और छोटे मियाँ' या चित्रपटात व्यस्त असेल. कारण निर्माता म्हणून हा त्याचा मोठा चित्रपट असणार आहे. अशा परिस्थितीत दोघेही त्यांचे हनिमून प्लॅन रद्द करू शकतात आणि कामातून ब्रेक घेऊन नंतर हनिमूनचे प्लॅन करू शकतात असे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amarnath Yatra Bus Accident : अमर यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

SCROLL FOR NEXT