Rakhi Sawant And Shah Rukh Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant ला व्हायचंय आई, म्हणून Shah Rukh Khan कडे केली विचित्र मागणी

Rakhi Sawant Strange Request To Shah Rukh Khan: राखी सावंतने शाहरुख खानकडे केलेली मागणी ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. सध्या तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

Rakhi Sawant Video:

बॉलिवूडची (Bollywood) 'ड्रामा क्वीन' अर्थात अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच या नाही तर त्या कारणांमुळे चर्चेत असते. राखी सावंत आपल्या वादग्रस्त वक्तव्य, ड्रेसिंग स्टाइल आणि व्हिडीओंमळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. राखी सावंतने पुन्हा एकदा असं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. राखी सावंतने थेट बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) विचित्र मागणी केली आहे. नेमकं राखी काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राखी सावंतने शाहरुख खानकडे केलेली मागणी ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. पण हे खरं आहे. राखी सावंतने सर्वांसमोर शाहरुख खानकडे ही मागणी केली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिने शाहरुखसोबत काम करण्याची किंवा त्याच्यासोबत सेल्फी घेण्याची मागणी नाही केली. तर राखी सावंतला आई व्हायचे आहे. त्यासाठी तिने शाहरुख खानकडे स्पर्मची मागणी केली आहे.

ड्रामा क्वीनने उघडपणे शाहरुख खानच्या स्पर्मची मागणी केली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत मीडियाला मुलाखत देताना दिसत आहे. ती म्हणते की, 'मी कोणाचेही स्पर्म घेऊ शकते आणि मी मुलांना जन्म देऊ शकते' राखी सावंतला प्रश्न विचारण्यात आला होता की, असा कोणता बॉलिवूड स्टार आहे ज्याला तुला बाबा बनवायचे आहे. राखी सावंतने या प्रश्नाला मजेशीर उत्तर दिले. पण सध्या तिच्या या व्हिडीओची चर्चा होत आहे.

राख सावंतने या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, 'शाहरुख! शाहरुख खान मला त्याचे स्पर्म देऊ शकतो आणि मी सरोगसी करू शकते. त्याची मुलं खूप गोंडस आहेत.' आता राखी सावंतच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटिझन्स देखील यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने या व्हिडीओवर कमेंट्स करत लिहिले की, 'हिचा उत्साह बघा, तो शाहरुख खान आहे कमाल खान नाही.' या व्हिडीओवर नेटिझन्सनी केलेल्या कमेंट्स वाचून तुम्हाला देखील हासू आवरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oppo Find X9: भारतात २०० एमपी कॅमेरासह 'हा' नवीन फोन होणार लाँच, कंपनीने दिली ९९ रुपयांची खास ऑफर

Samantha Ruth Prabhu: साऊथ अभिनेत्री समांथाने कथित बॉयफ्रेंडसोबतचा फोटो केला पोस्ट, फोटोंवर लाईक्सचा होतोय वर्षाव

४ नवीन वंदे भारत धावणार! PM नरेंद्र मोदींकडून हिरवा कंदील, वाचा थांबे अन् वेळापत्रक

Fake Currency Scam : धक्कदायक! पैसे दुप्पट करून देतो सांगायचा, खऱ्या पैशांऐवजी द्यायचा खेळण्यातील नोटा, नेमकं प्रकरण काय?

Nashik : नाशिककरांनो पाण्याचा जपून वापर करा, शहरातील 'या' भागात आज पाणी नाही | VIDEO

SCROLL FOR NEXT