Priyanka Chopra Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra: मायदेशी येताच प्रियंका चोप्राच्या हाती लागला बिग बजेट चित्रपट, संजय लीला भन्साळींसोबत करणार काम

Priyanka Chopra Movie: प्रियंका चोप्राचे चाहते देखील तिच्या बॉलिवूडमधील पुनरागमनाची वाट पाहत होते. अखेर त्यांची ती इच्छा पूर्ण होणार आहे. कारण प्रियंका चोप्रा लवकरच संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करणार आहे.

Priya More

Priyanka Chopra Comeback In Bollywood:

बॉलिवूडची (Bollywood) 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या चर्चेमध्ये आहे. जवळपास ५ महिन्यांनंतर प्रियंका चोप्रा मायदेशी आली आहे. मागच्या आठवड्यात गुरुवारी प्रियंका चोप्रा पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत भारतामध्ये आली. भारतामध्ये आल्यानंतर प्रियंका चोप्राने आपल्या कुटुंबीयांसोबत अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतलं. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता प्रियंका चोप्राबाबत नवीन माहिती समोर आली आहे. प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे.

मायदेशी येताच तिच्या हाती बिग बजेट चित्रपट लागला आहे. प्रियंका चोप्रा लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटामध्ये काम करणार असल्याची चर्चा सुरू आहे. प्रियंका चोप्राचे चाहते देखील तिच्या बॉलिवूडमधील पुनरागमनाची वाट पाहत होते. अखेर त्यांची ती इच्छा पूर्ण होणार आहे. कारण प्रियंका चोप्रा लवकरच संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करणार आहे. यासाठी दोघांमध्ये चित्रपटाबाबत चर्चा देखील सुरू आहेत. प्रियांका चोप्रा संजय लीला भन्साळी यांच्या पीरियड ॲक्शन चित्रपटात दिसणार आहे. पण आत्तापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत बातमी समोर आलेली नाही.

संजय लीला भन्साळी आणि प्रियांका चोप्राच्या पुढील चित्रपटाची बातमी कळताच तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. प्रियंका चोप्रा आणि संजय लीला भन्साळी यांनी याआधीही चित्रपटात एकत्र काम केले आहे. प्रियांका चोप्रा आणि संजय लीला भन्साळी यांनी 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात प्रियांका चोप्राने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. प्रियंका चोप्रा आता संजय लीला भन्साळींच्या चित्रपटामध्ये नेमकी काय भूमिका साकारणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

दरम्यान, प्रियंका चोप्रा आपल्या कामातून १० दिवसांचा ब्रेक घेऊन भारतामध्ये आली आहे. प्रियंका मुंबईमध्ये इंटरनॅशनल ज्वेलरी ब्रँड बुल्गारीच्या मुंबई स्टोअरच्या उद्घाटनासाठी भारतात आली होती. या ज्वेलरी ब्रँडने प्रियंका चोप्राला उद्घाटनासाठी स्पेशल गेस्ट म्हणून बोलावले होते. हा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर प्रियंका चोप्रा आपल्या कुटुंबीयांसोबत अयोध्येला गेली आणि तिने सहकुटुंब रामल्लाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. यावेळी प्रियंकाने साडी नेसली होती. तर निक आणि मालती देखील पारंपारिक लूकमध्ये दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT