Poacher Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poacher Trailer: हस्तिदंताच्या तस्करीवर आधारित 'पोचर'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, आलिया भट्टशी आहे खास कनेक्शन

Bollywood Actress Alia Bhatt: निर्मात्यांनी 'पोचर' या वेबसीरिजचा दमदार ट्रेलर रिलीज केला आहे. हा धमाकेदार ट्रेलर (Poacher Trailer) पाहून प्रेक्षकांच्या मनामध्ये या वेबसीरिजबाबतची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. ते ही वेबसीरिज रिलीज होण्याच वाट पाहत आहेत.

Priya More

Poacher Trailer Released:

ओटीटीवर (OTT) नवीन चित्रपट आणि वेबसीरिजची वाट पाहण्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांच्या भेटीला 'पोचर' (Poacher Web Series) ही नवी वेब सीरिज येणार आहे. क्राईमवर आधारित या वेबसीरिजची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अशातच निर्मात्यांनी या वेबसीरिजचा दमदार ट्रेलर रिलीज केला आहे. हा धमाकेदार ट्रेलर (Poacher Trailer) पाहून प्रेक्षकांच्या मनामध्ये या वेबसीरिजबाबतची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. ते ही वेबसीरिज रिलीज होण्याच वाट पाहत आहेत.

एमी पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते रिची मेहता यांनी आज पोचर या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज केला आहे. 'पोचार'ची कथाही त्यांनी लिहिली आहे. हा ट्रेलर घनदाट जंगलात असे सत्य शोधण्याशी संबंधित आहे जो प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतो आणि त्यांना अस्वस्थ देखील करतो. या वेबसीरिजमध्ये निमिषा सजयन, रोशन मॅथ्यू आणि दिव्येंदू भट्टाचार्य यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ही वेबसीरिज प्रोडक्शन आणि फायनान्स कंपनी QC एंटरटेनमेंटने सादर केली आहे. या कंपनीने जॉर्डन पीलचा 'गेट आउट' आणि स्पाइक लीचा 'ब्लॅकक्लान्समन' सारखे हिट चित्रपट दिले आहेत.

'पोचर'च्या ट्रेलरमध्ये या वेबसीरिजची मूळ कथा पाहायला मिळते. यामध्ये हत्तींच्या क्रूर आणि सततच्या हत्येचे हृदयद्रावक वास्तव समोर आले आहे. त्यानंतर वनविभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर अवैध हस्तिदंत शिकार करणाऱ्या टोळीचे हे काम असल्याचे समोर आले आहे. आता ही वेबसीरिज पाहून तुम्हाला पोलिस अधिकारी आरोपींना कसे पकडतील आणि या टोळीचा पर्दाफाश कसा करणार आहे. पण यासाठी तुम्हाला 23 फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे.

'पोचार'ची खास गोष्ट म्हणजे आलिया भट्ट या वेबसीरिजची कार्यकारी निर्माती आहे. सत्य घटनांवर आधारित ८ एपिसोडची ही क्राईम वेबसीरिज हस्तिदंत शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करते. 'पोचार' वेबसीरिज मल्याळम, हिंदी आणि इंग्रजीमध्ये या तीन भाषांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 'पोचार' वेबसीरिज थेट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. येत्या 23 फेब्रुवारी 2024 पासून देशभरातील आणि जगभरातील प्रेक्षकांना ही वेबसीरिज पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

HBD Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर चाहतीने केली होती तब्बल ७२ कोटींची संपत्ती, पैशांचं अभिनेत्याने काय केलं?

Marathi Hindi Language Controversy : "मराठी बोलना जरुरी हैं क्या ?" म्हणणाऱ्या खारघरमधील परप्रांतीय तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला

SCROLL FOR NEXT