Parineeti Dedicates Songs To Raghav Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Dedicates Songs To Raghav: लग्नानंतर परिणीती चोप्राने नवऱ्याला दिलं मोठं गिफ्ट, राघव चड्ढासाठी गायलं स्पेशल गाणं

Parineeti Chopra O Piya Song: लग्नानंतर परिणीतीने राघव चड्ढाला खास गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टच्या माध्यमातून तिने राघवचे मन जिंकलं आहे.

Priya More

Parineeti Chopra And Raghav Chadha Wedding:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) नुकताच विवाहबंधनात अडकली. परिणीतीने २४ सप्टेंबरला आपचे खासदार राघव चड्ढासोबत लग्न केले. उदयपूरमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. परिणीती आणि राघवच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अशामध्ये लग्नानंतर परिणीतीने राघव चड्ढाला खास गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टच्या माध्यमातून तिने राघवचे मन जिंकलं आहे.

परिणीती चोप्राने राघव चड्ढासाठी एक गाणं डेडिकेट केलं आहे. परिणीतीने हे गाणं स्वत:च गायलं आहे. सर्वांना माहिती आहे की, परिणीती ही उत्कृष्ट अभिनेत्रीसोबत गायिका देखील आहे. ती नेहमी आपल्या आवाजात गायलेलं गाणं सोशल मीडियावर शेअर करत असते. परिणीतीचा आवाज खूपच मधुर आहे. अशामध्ये परिणीतीने आपल्या आवाजामध्ये राघवसाठी 'ओ पिया' हे गाणं गायलं आहे.

परिणीतीने राघवसाठी 'ओ पिया' हे गाणं गात आपलं प्रेम जाहीर केलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून परिणीतीने राघवचं मन जिंकलं आहे. हे गाणं गौरव दत्ता यांनी कंपोज केलं आहे. तर गौरव, सनी एमआर आणि हरजोत कौर यांनी हे गाणं लिहिलं आहे. परिणीतीचे हे गाणं सध्या चर्चेत आलं आहे. या गाण्याला आतापर्यंत ९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

लग्नानंतर परिणीती चोप्रा उदयपूरवरून दिल्लीला आपल्या सासरी रवाना झाली. दिल्लीतील घरी नव्या नवरीचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. लग्नानंतर परिणीती आणि राघव चंदीगड आणि दिल्लीमध्ये रिसेप्शन पार्टी देणार असल्याचे सांगितले जात होतो. पण आता न्यूज १८ ने दिलेल्या माहितीनुसार, या कपलची रिसेप्शन पार्टी चंदीगड आणि दिल्लीमध्ये न होता फक्त मुंबईतच होणार आहे. ४ ऑक्टोबरला ही रिसेप्शन पार्टी होणार असून याला बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akkalkot : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अक्क्लकोटचं श्री स्वामी मंदिर 20 तास खुलं राहणार | VIDEO

Education Justice : पुण्यात नामांकित कॉलेजने कागद पडताळणीसाठी केला उशीर, तरुणाची ब्रिटनमधली नोकरी गेली, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Bhaubeej Gift: अजून ठरलं नाही बहिणीसाठी गिफ्ट? पाहा भाऊबीजासाठी खास आणि ट्रेंडी गिफ्ट Ideas

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

SCROLL FOR NEXT