OTT Release Saam Tv
मनोरंजन बातम्या

OTT Release: 'डंकी'पाठोपाठ आता 'सालार' आणि 'हनुमान'सह हे चित्रपट OTT वर होणार रिलीज, तुम्ही कोणता पाहणार?

Salaar-Fighter-The Kerala Story Movie: यंदाचा हा आठवडा सिनेरसिकांसाठी खूपच मनोरंजक ठरणार आहे. या चित्रपटांपैकी कोणाताही चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहिला नसेल तर तुमच्यासाठी ही खास पर्वणी असणार आहे. तुम्हाला घरी बसल्या आपल्या परिवारासोबत हा चित्रपट पाहता येणार आहे.

Priya More

OTT Release This Weekend:

ओटीटीवर (OTT) नवीन चित्रपट आणि वेब सीरिजच्या रिलीजची वाट पाहणाऱ्यांसाठी यंदाचा आठवडा हा खूपच खास असणार आहे. या आठवड्यामध्ये म्हणजे डंकीपाठोपाठ प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar Movie) आणि विवेक अग्निहोत्रीच्या 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story Movie) या चित्रपटसह अनेक चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. त्यामुळे यंदाचा हा आठवडा सिनेरसिकांसाठी खूपच मनोरंजक ठरणार आहे. या चित्रपटांपैकी कोणाताही चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहिला नसेल तर तुमच्यासाठी ही खास पर्वणी असणार आहे. तुम्हाला घरी बसल्या आपल्या परिवारासोबत हा चित्रपट पाहता येणार आहे.

या आठवड्यामध्ये 'हनुमान', 'द केरल स्टोरी', 'फाइटर' आणि 'सालार- हिंदी' हे चित्रपट ओटीटीवर रिलीज (OTT Release) होणार आहेत. नुकताच शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. त्यानंतर आता हे चार चित्रपट रिलीज होणार असल्यामुळे प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला आहे. हे सर्व चित्रपट कोणत्या दिवशी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत हे आज आपण पाहणार आहोत...

सालार: पार्ट १ (हिंदी) -

साऊथ सुपरस्टार प्रभासचा 'सालार- पार्ट 1' या चित्रपटाचा हिंदी वर्जन आज म्हणजेच १६ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. प्रशांत नील यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला आणि विजय किरागांडूर निर्मित हा एक ॲक्शन चित्रपट आहे. यात प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन हे प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये श्रुती हासन, जगपती बाबू, बॉबी सिम्हा, टिनू आनंद, ईश्वरी राव, श्रिया रेड्डी आणि रामचंद्र राजू यासह सहाय्यक कलाकार आहेत.

द केरळ स्टोरी -

'द केरळ स्टोरी' हा 2023 चा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे जो दीर्घ काळानंतर OTT वर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट तुम्ही आजपासून म्हणजेच १६ फेब्रुवारीपासून Zee5 वर देखील पाहू शकता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. यात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांच्या भूमिका आहेत.

हनुमान -

'हनुमान' हा २०२४ चा सुपरहिरो चित्रपट आहे. प्रशांत वर्मा यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्राइमशो एंटरटेनमेंट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार, समुथिरकणी, विनय राय आणि वेनेला किशोर यांच्यासोबत तेजा सज्जा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 2 मार्च 2024 रोजी Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.

फायटर -

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' हा ॲक्शन चित्रपट आहे. हा चित्रपट रॅमन चिबसोबत लिहिलेल्या कथेवर आधारित आहे. Viacom18 Studios आणि Marflix Pictures अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 21 मार्च 2024 रोजी रिलीज होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

SCROLL FOR NEXT