Rajkumar Kohli Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajkumar Kohli Passes Away: 'बिग बॉस' फेम अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, या सुपरहिट चित्रपटांची केलीये निर्मिती

Actor Armaan Kohli Father Death: शुक्रवारी सकाळी आठ वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घरातील बाथरूममध्ये ते बेशुद्धावस्थेत पडले होते. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Priya More

Naagin Fame Director Death:

हिंदी चित्रपटसृष्टीतून (Hindi Film Industry) एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. बॉलिवूडला (Bollywood) अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या चित्रपट निर्माते राजकुमार कोहली (Rajkumar Kohli) यांचे निधन झाले आहे. राजकुमार यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घरातील बाथरूममध्ये ते बेशुद्धावस्थेत पडले होते. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'नागिन' आणि 'जानी दुश्मन' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार कोहली यांचे मुंबईत निधन झाले. राजकुमार कोहली हे बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीचे वडील आहेत. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

राजकुमार कोहलीने 1963 मध्ये निर्माता म्हणून करिअरला सुरुवात केली. 1963 मध्ये त्यांनी 'पिंड दी कुडी' आणि 'सपनी' या पंजाबी चित्रपटांची निर्मिती केली. यानंतर त्यांनी गोरा और काला, डंका, दुल्ला भट्टी, मैं जट्टी पंजाब दी या चित्रपटांची निर्मिती केली. राजकुमार कोहली यांनी धर्मेंद्र, जितेंद्र, हेमा मालिनी, सनी देओल, अक्षय कुमार, सलमान खान आणि राज बब्बर यांच्यासह अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. शेवटी ते सलमान खानचा चित्रपट प्रेम रतन धन पायो मध्ये दिसले होते.

राजकुमार कोहलीचा जन्म 14 सप्टेंबर 1930 रोजी झाला होता. त्यांच्या पत्नी निशी कोहली हिंदी आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. याशिवाय 1992 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा अरमान कोहलीची ओळख करून दिली. राजकुमार कोहलीने 1992 मध्ये रिलीज झालेल्या 'विद्रोही' या चित्रपटातून मुलगा अरमानला लॉन्च केले होते. त्यानंतर त्यांनी दुश्मन, कहार आणि जानी दुश्मन: एक अनोखी कहानी या चित्रपटांची निर्मिती केली होती. राजकुमार कोहली यांनी आपल्या कारकिर्दीत 'नागिन', 'मुकाबला', 'जानी दुश्मन', 'बदले की आग', 'इन्सानियत का दुश्मन', 'जानी दुश्मन एक: अनोखी कहानी' यासारखे सुपरहिट चित्रपट दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT