Mrunal Thakur wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mrunal Thakur wedding: खरंच मृणाल ठाकूर लग्न करणार का? चर्चानंतर अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

Mrunal Thakur :मृणाल लवकरच लग्न करणार आहे अशा चर्चांना उधाण आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mrunal Thakur Wedding Rumours :

बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूरने खूप नावलौकिक मिळवले आहे. मृणाल ठाकूर नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. मृणाल नेहमीच तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. परंतु आता मृणाल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

मृणाल लवकरच लग्न करणार आहे अशा चर्चांना उधाण आले आहे. एका रिपोर्टनुसार, मृणाल एका तेलुगू अभिनेत्याच्या प्रेमात असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा दोन दिवसांपासून रंगल्या आहेत.

नुकत्याच एका कार्यक्रमात, ज्येष्ठ चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांनी मृणालला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला. त्याचसोबत त्यांनी मृणालला लग्नासाठीदेखील आशिर्वाद दिले. तेव्हापासूनच मृणालच्या लग्नाबाबतच्या चर्चांना उधाण आले. मृणालच्या लग्नाच्या बातमीमुळे चाहत्यांदेखील आनंद झाला.

त्यानंतर मृणालने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतील लग्नाविषयी तिचे मत माडंले. मृणाल म्हणाली की, 'माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. दोन व्यक्ती एकत्र राहून सुखाचा संसार करु शकतात यावर मला विश्वास आहेत. असे अनेक यशस्वी संसार मी पाहिले आहेत. मला असे वाटते की, आपल्यासाठी योग्य असलेल्या व्यक्तीशी आपण लग्न केले पाहिजे. तुम्ही ती व्यक्ती १८, २० वर्षांची असताना किंवा ३० ते ६० वर्षांचे असताना देखील शोधू शकता. लग्नासाठी जोडीदार शोधण्यासाठी वय नसते. योग्य व्यक्ती भेटली की जास्त वेळ थांबू नका. लगेचच लग्न करा'.

या मुलाखतीनंतर मृणालच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या असता अभिनेत्रीने स्वतः या सर्व अफवा असल्याच्या सांगितले आहे. मृणालने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, 'या अफवा किती मजेशीर आहे हे मी सांगू शकत नाही. मला माझं हसू कंट्रोल करता आले नाही. माझं लग्न लवकरच होईल.तुम्ही मुलगा शोधा आणि मला त्याच्याबद्दल माहिती सांगा'.

मृणालने या व्हिडिओच्या माध्यमातून लग्नाच्या अफवा असल्याचं स्पष्ट करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT