Kajal Aggarwal  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kajal Aggarwal: काजल अग्रवालसोबत तरुणाने केलं गैरवर्तन, फोटो काढण्याच्या बहाण्याने लावला कंबरेला हात; VIDEO व्हायरल

Man Misbehaves With Kajal Aggarwal : काजल अग्रवाल तिचे वडील विनय यांच्यासोबत हैदराबादमध्ये एका स्टोअरच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी गेली होती. त्याचवेळी तिच्यासोबत ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

Kajal Aggarwal Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री काजल अग्रवालसोबत (Kajol Aggarwal) एका तरुणाने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फोटो काढण्याच्या बहाण्याने आलेल्या या तरुणाने थेट अभिनेत्रीच्या कंबरेला हात लावला. तरुणाने कंबरेला स्पर्श केल्यामुळे अभिनेत्री अस्वस्थ झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काजल अग्रवाल ही सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. काजल सध्या चित्रपटामध्ये काम करत नसली तरी देखील ती चर्चेत असते. ती अनेक कार्यक्रमामध्ये हजेरी देखील लावते. प्रमोशन करण्यासाठी किंवा उद्घाटनांच्या कार्यक्रमासाठी ती जाते. अशाच एका कार्यक्रमात गेली असता काजल अग्रवालसोबत वाईट घटना घडली. त्यामुळे ती अस्वस्थ झाली. काजल अग्रवाल तिचे वडील विनय यांच्यासोबत हैदराबादमध्ये एका स्टोअरच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी गेली होती. त्याचवेळी तिच्यासोबत ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, स्टोअरच्या उद्घाटनादरम्यान एक तरुण सेल्फी घेण्यासाठी काजलच्या दिशेने येतो. हा तरुण फोटो काढण्यासाठी काजलच्या बाजूला उभा राहतो. त्याचवेळी तो काजलच्या कंबरेला हात लावतो. तरुणाच्या कृत्यामुळे काजल घाबरलेली दिसते. त्यानंतर ती या तरुणाला दूर करण्याचा प्रयत्न करते. यावेळी काजलच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. काजलच्या चाहत्यांनी या तरुणाच्या वागण्यावर टीका केली. पण काजलने कार्यक्रमात व्यत्यय येऊ दिला नाही आणि नंतर उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. काजल अग्रवाल ही पहिली अभिनेत्री नाही जिच्यासोबत असा प्रकार घडला आहे. सारा अली खान, अपर्णा बालमुरली, आहाना कुमरा या अभिनेत्रींना देखील अशाच प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागले.

काजल अग्रवालने २०२२ मध्ये पती गौतमसोबत मुलगा नीलचे स्वागत केले. त्यानंतर काजलने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. आता ती कामावर पुन्हा रुजू झाली आहे. लवकरच ती तेलुगू चित्रपट 'सत्यभामा' आणि तामिळ चित्रपट 'इंडियन 2' मध्ये दिसणार आहे. काजल अग्रवालच्या या चित्रपटाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT