Arjun Kapoor -Malaika Arora Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arjun Kapoor Video: मलायका- अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम, अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत केलं प्रेम व्यक्त

Priya More

Arjun Kapoor And Malaika Arora:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पण याबाबत अर्जुन किंवा मलायका यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण आता समोर आलेल्या एका व्हिडीओवरून या चर्चांना पूर्णविराम मिळाले आहे.

अर्जुन आणि मलायकाबाबत सोशल मीडियावर दावा करण्यात आला होता की, ते दोन महिन्यांपूर्वी एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. आता या चर्चांदरम्यान मलायकाने अर्जुनसोबतचा एक व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडीओमुळे मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपच्या चर्चा खऱ्या नव्हत्या असे दिसून येत आहे. मलायका अरोराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर फ्रेंड्ससोबत नाचताना दिसत आहे.

मलायका अरोराने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर अर्जुन कपूरसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर त्याचा जवळचा मित्र रणवीर सिंगसोबत डीजेवर डान्स आणि मस्ती करताना दिसत आहे. मलायकाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अर्जुन आणि रणवीर दोघेही धम्माल करताना दिसत आहे. नुकताच अवंतिका मलिकने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोराव्यतिरिक्त इतर काही जण दिसून येत आहेत. या फोटोमध्ये मलायका आणि अर्जुन स्माइल देताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करताना मलायकाने अर्जुनला खूप मस्त म्हटले आहे. हा व्हिडिओ अर्जुन मलायकाच्या मित्राच्या लग्न समारंभातील असल्याचे सांगितले जात आहे. जिथे अर्जुन आणि मलायकाने एकत्र हजेरी लावली होती. या व्हिडिओच्या माध्यमातून मलायकाने अर्जुनपासून वेगळे होण्याच्या अफवांना आपल्या स्टाईलमध्ये पूर्णविराम दिला आहे. यासोबतच तिने अजूनही प्रेमात असल्याचा पुरावाही दिला आहे.

नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्ट्समध्ये मलायका आणि अर्जुनचे दोन महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाले होते. पण आता पुन्हा हे कपल एकत्र आले आहे. दोघांनी देखील चर्चा करून नात्यातला दूरावा कमी केला आहे. दरम्यान, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे गेल्या ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर देखील हे कपल एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करताना दिसतात. लवकरच हे कपल लग्न करणार असल्याच्या चर्चा देखील सुरू होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

Maharashtra News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाशिम दौरा रद्द

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

SCROLL FOR NEXT