Johnny Lever On Shah Rukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Johnny Lever: 'बाजीगर'च्या वेळी मी शाहरुख खानपेक्षा जास्त प्रसिद्ध होतो...' जॉनी लिव्हरने केला खुलासा

Johnny Lever On Shah Rukh Khan: अर्जुन रामपालनंतर जॉनी लिव्हरने किंग खानबद्दल बरेच खुलासे केले आहेत. जॉनी लिव्हरच्या (Johnny Lever) काही गोष्टी लोकांना खूप आश्चर्यचकित करतात. 'शाहरुख खानपेक्षा तो जास्त प्रसिद्ध असल्याचे त्याने म्हटले आहे.

Priya More

Johnny Lever Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये जोरदार पुनरागमन करत ट्रोलर्सची बोलती बंद केली. शाहरुख खानने एकापोठापाठ ३ सुपरहिट चित्रपट दिले. त्यानंतर शाहरुख खानचे चाहते त्याचे कौतुक करताना दिसतात. त्याच्या चाहत्यांसोबतच बॉलिवूड स्टार्सही शाहरुख खानचे खूप कौतुक करत आहेत. नुकतेच अर्जुन रामपालने एका मुलाखतीदरम्यान शाहरुख खानच्या मेहनतीचे कौतुक केले होते. त्यानंतर शाहरुख खान पुन्हा एकदा त्याच्या कमबॅकमुळे चर्चेत आला आहे. अर्जुन रामपालनंतर जॉनी लिव्हरने किंग खानबद्दल बरेच खुलासे केले आहेत. जॉनी लिव्हरच्या (Johnny Lever) काही गोष्टी लोकांना खूप आश्चर्यचकित करतात. 'शाहरुख खानपेक्षा तो जास्त प्रसिद्ध असल्याचे त्याने म्हटले आहे.

जॉनी लिव्हरने यूट्यूबर रणवीर अल्लाबदियाच्या शोमध्ये त्याच्या आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आणि त्यादरम्यान त्याने सांगितले की, 'बाजीगर' चित्रपटादरम्यान ते शाहरुखपेक्षा जास्त प्रसिद्ध होते. अभिनेत्याने सांगितलं, 'जेव्हा बाजीगर तयार होत होता तेव्हा लोकं मला शाहरुख खानपेक्षा जास्त ओळखत होते. तेव्हा मी स्टार होतो आणि शाहरुख खान नुकताच उदयास येत होता.'

जॉनी लिव्हरने पुढे किंग खानबद्दल सांगितले की, 'मी शाहरुख खानसारखा मेहनती माणूस पाहिला नाही. त्या काळात शाहरुखला डान्स आणि ॲक्शन सीन्स करण्यात अडचण येत होती. असे असूनही त्याने ते आव्हान म्हणून घेतले आणि खूप मेहनत घेतली. आज तो ॲक्शन आणि डान्स दोन्ही उत्तम करतो. यामागे त्याची मेहनत आहे. कालांतराने त्याला त्याच्या मेहनतीचे फळही मिळाले.' याशिवाय जॉनी लिव्हरने सलमान खानला मूडी असल्याचे सांगितले.

'दर्द का रिश्ता' चित्रपटानंतर जॉनी लिव्हरने मागे वळून पाहिले नाही. त्याने 'राजा हिंदुस्तानी', 'जुदाई चालबाज', 'बाजीगर', 'येस बॉस', 'इश्क', 'आंटी नंबर 1', 'दुल्हे राजा', 'कुछ कुछ होता है' यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जॉनी लिव्हरचे खरे नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे. या अभिनेत्याने स्टँड अप कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात केली होती. एक काळ असा होता की तो स्टेज शो करायचा. अशाच एका स्टेज शोमध्ये सुनील दत्त यांची नजर त्याच्यावर गेली. 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात त्यांनी जॉनी लीव्हरला पहिला ब्रेक दिला.

जॉनी लिव्हरने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने पडद्यावर प्रत्येक सुपरस्टारसोबत काम केले आहे. यापैकी एक म्हणजे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान. शाहरुख खानसोबत त्याने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या. त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. अशामध्ये आता त्याने नुकताच शाहरुख खानचे खूप कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT