Nupur Shikhare Dance Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nupur Shikhare Dance: नुपूर शिखरेचा 'लुंगी डान्स', आमिर खानच्या जावयाचा VIDEO होतोय व्हायरल

Ira Khan And Nupur Shikhare Dance Video: उदयपूरमध्ये या कपलचे प्री-वेडिंग फंक्शन सुरू आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या ग्रँड वेडिंगपूर्वी सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Priya More

Ira Khan And Nupur Shikhare Wedding:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी मुलगी आयरा खान (Ira Khan) 10 जानेवारीला म्हणजे बुधावारी विवाहबंधनामध्ये अडकणार आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरेच्या लग्नाबाबत सर्वजण खूपच उत्सुक आहे. उदयपूरमध्ये या कपलचे प्री-वेडिंग फंक्शन सुरू आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या ग्रँड वेडिंगपूर्वी सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नुकतेच नुपूर शिखरे आणि आयरा खानच्या मेहेंदी फंक्शनमधील व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते. त्यानंतर या कपलने एकत्र डान्स केला होता. आता नुपूर शिखरेच्या लुंगी डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. आमिर खानच्या जावयाच्या हटके डान्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये नुपूर शिखरे ग्रेसफुली डान्स करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नुपूर शिखरे त्याच्या मित्रांसोबत लुंगी घालून हॉलमध्ये एन्ट्री करतो. यानंतर नुपूर शिखरे 'चेन्नई एक्सप्रेस'मधील 'लुंगी डान्स' या गाण्यावर फ्लोअरवर डान्स करायला लागतो. नुपूर शिखरेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओलो त्याच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे.

आयरा आणि नुपूरच्या लग्नाच्या फंक्शनमध्ये या कपलसोबत त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार खूप धम्माल करताना दिसत आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने सोमवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आयरा खान मेहेंदी लावताना आणि तिच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह डान्स करताना दिसली. त्याचवेळी नुपूर शिखरे पाहुण्यांसोबत जोमाने डान्स करताना दिसला. शाहरुख खानच्या 'जुगनू' या गाण्यावर नुपूर शिखरे त्याची मैत्रीण मिथिला पालकरसोबत जबरदस्त डान्स करताना दिसला. आयरा खान आणि नुपूर शिखरेचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

दरम्यान, आयरा आणि नुपूरच्या कुटुंबीयांसाठी आणि पाहुण्यांसाठी 176 हॉटेल रूम बुक करण्यात आल्या आहेत. या शाही विवाह सोहळ्याला सुमारे 250 जण उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लग्नात सहभागी होण्यासाठी कुटुंबीय आणि इतर पाहुणे येण्यास सुरुवात झाली आहे. हे सर्व पाहुणे 10 जानेवारीपर्यंत उदयपूरमध्येच राहणार आहेत. त्यांच्या राहण्या आणि खाण्याची उत्तम सोयी करण्यात आली आहे. आयरा आणि नुपूरच्या लग्नाच्या मेनूमध्ये गुजराती आणि महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश असेल. इरा आणि नुपूर यांनी ३ जानेवारी रोजी मुंबईतील वांद्र्यातील ताज लँड्स एंड येथे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाह नोंदणीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

SCROLL FOR NEXT