Yami Gautam Pregnant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Yami Gautam आई होणार, 'Article 370' च्या ट्रेलर लाँचवेळी आदित्यने घेतली बायकोची काळजी; VIDEO व्हायरल

Yami Gautam Pregnant : यामी गौतम आणि आदित्य धरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. यामी गौतम आई होणार आहे. या कपलने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. पण सध्या सोशल मीडियावर यामी गौतमचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Priya More

Yami Gautam Pregnancy:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) आणि चित्रपट निर्माता आदित्य धर (Aditya Dhar) सध्या चर्चेत आले आहेत. यामी गौतम आणि आदित्य धरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. यामी गौतम आई होणार आहे. या कपलने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. पण सध्या सोशल मीडियावर यामी गौतमचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये आदित्य धर पत्नी यामीची काळजी घेताना दिसत आहे.

'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' आणि 'विकी डोनर' यासारख्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी यामी गौतम लवकरच 'आर्टिकल 370' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच निर्मात्यांनी 'आर्टिकल 370' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. या ट्रेलर लाँच इव्हेंटला आलेल्या यामी गौतमीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. यामी गौतमी यावेळी ब्लेझरने आपला बेबी बंप कव्हर करताना दिसली.

'आर्टिकल 370' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये यामी गौतमी सांभाळून आणि हळूहळू चालताना दिसली. त्याचसोबत यावेळी घेण्यात आलेल्या प्रेस कॉन्फरन्सवेळी तिचा पती आदित्य देखील तिची काळजी घेताना दिसला. खुर्चीवर बसलेल्या यामी गौतमीला व्यवस्थित बसता यावे यासाठी तिचा पती आदित्य धर उशी आणून देताना दिसला. यावेळी यामीसुद्धा पत्रकारांना सांगते की, 'आदित्य माझी खूप काळजी घेतो.' त्यामुळे आता यामी गौतमी प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच यामी आणि तिचा पती आदित्य आई-बाबा होणार आहे. ते लवकरच ही आनंदाची बातमी जाहिर करतील आणि चाहत्यांसोबत शेअर करतील. यामीला पाचवा किंवा सहावा महिना सुरू असल्याचे म्हटले जात आहे. यामी गौतम प्रेग्नेंट असल्याचे कळताच तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. ते तिच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. लग्नाच्या 3 वर्षानंतर यामी आणि आदित्य आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे.

काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची कथा कलम 'आर्टिकल 370' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे यांच्या या चित्रपटात यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे नाव अनेक दिवसांपासून सतत चर्चेत आहे. यामी गौतमीसह या संपूर्ण चित्रपटाची टीम आगामी 'आर्टिकल 370' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाची निर्मिती यामीचा पती आदित्य धरने केली आहे. 2019 मध्ये 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'च्या सेटवर भेटलेल्या या यामी आणि आदित्य यांनी दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर 4 जून 2021 ला लग्न केले. आता हे कपल आई-बाबा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT