Esha Deol And Bharat Takhtani Divorce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bharat Takhtani ला घटस्फोट दिल्यानंतर Isha Deol याठिकाणी राहणार, २ मुलींची जबाबदारी नेमकं कोण घेणार?

Esha Deol And Bharat Takhtani Divorce: ईशा आणि भरतचा १२ वर्षांचा सुखी संसार मोडला आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. भरत तख्तानी आणि ईशा देओल यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या.

Priya More

Esha Deol And Bharat Takhtani Love Story:

फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत. तर काही सेलिब्रिटी विभक्त होताना दिसत आहेत. नुकताच बी टाऊनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol) लग्नाच्या १२ वर्षानंतर पती भरत तख्तानीपासून (Bharat Takhtani) वेगळी झाली आहे.

ईशा आणि भरतचा १२ वर्षांचा सुखी संसार मोडला आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. भरत तख्तानी आणि ईशा देओल यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. पण आता त्यांच्या घटस्फोटाच्या (Esha Deol And Bharat Takhtani Divorce) चर्चेवर शिक्कामोर्तब झाला आहे. ईशा आणि भरत या दोघांनी घटस्फोट घेतल्याच्या बातमीला दजोरा दिला आहे.

ईशा देओल आणि भरत यांनी दिल्ली टाइम्सला जारी केलेल्या संयुक्त निवेदनात त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती दिली आहे. या निवेदनात दोघांनी म्हटले आहे की, 'आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या जीवनातील हा बदल आपल्या आणि आपल्या मुलांच्या दोघांच्या हिताचा आहे आणि तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आमच्या गोपनीयतेचा आदर केला जाईल याची आम्हाला आशा आहे.' या कपलच्या घटस्फोटानंतर अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. आतापर्यंत ईशा देओल तिच्या मुलांसह भरत तख्तानीच्या घरात राहत होती. पण आता ती नेमकी कुठे राहणार?, त्यांची मुलं कोणासोबत राहणार?, मुलांची ते कशी काळजी घेणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लग्नाच्या १२ वर्षांनंतर पती भरत तख्तानीपासून वेगळे झाल्यानंतर ईशा देओलच्या आयुष्याला नवे वळण मिळाले आहे. भरत तख्तानी आणि ईशा देओलच्या लव्हस्टोरीनंतर आता त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही खूप चर्चेत आहेत. घटस्फोटाच्या बातम्यांनंतर आता ईशा देओलचे नवीन घर आणि मुलांची काळजी यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशामध्ये यासंदर्भात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

E24 च्या रिपोर्टनुसार, पती भरत तख्तानीपासून वेगळे झाल्यानंतर ईशा देओल आई हेमा मालिनी यांच्या बंगल्यात शिफ्ट होणार आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. याशिवाय मुलांची काळजी घेण्यासाठी या कपलने मोठा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, ईशा देओल आणि भरत तख्तानी मिळून मुलांची काळजी घेणार आहेत. या कपलला दोन मुली आहेत. ईशा देओल आणि भरत तख्तानी याचे वेगळे होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, भरत तख्तानीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे ईशा देओलला वेगळे होण्याचा निर्णय घ्यावा लागला असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

SCROLL FOR NEXT