Kriti Senon  Saam Tv
मनोरंजन बातम्या

महिलासुद्धा चांगली कॉमेडी करू शकतात..., 'Crew'च्या ट्रेलर लाँचनंतर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना Kriti Senonने दिलं उत्तर

Crew Movie Trailer: या चित्रपटाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशामध्ये ट्रेलर लाँच इव्हेंटदरम्यान या चित्रपटाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना क्रिती सेनॉनने स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.

Priya More

Crew Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Senon), करीना कपूर (Kareen Kapoor) आणि तब्बू (Tabbu) बहुप्रतिक्षित चित्रपट 'क्रू'च्या (Crew Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला. क्रू चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालताय. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटामध्ये क्रिती सेनॉन, करीना कपूर आणि तब्बूच्या रुपामध्ये तीन महिला मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशामध्ये ट्रेलर लाँच इव्हेंटदरम्यान या चित्रपटाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना क्रिती सेनॉनने स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.

'क्रू' या चित्रपटाविषयी बोलताना क्रिती सेनॉनने सांगितले की, 'चित्रपटात कोणत्याही मुद्द्यावर किंवा पुरुषांवर टीका केलेली नाही. पण महिलाही चांगली कॉमेडी करू शकतात हे प्रेक्षकांना दिसेल'. या चित्रपटाविषयी पुढे बोलताना क्रिती म्हणाली की, 'मला वाटते की आम्हाला बहुतेक पुरुषांसोबत काम करण्याची संधी मिळते. खरंतर महिलांसोबत काम करणं ही खूप रिफ्रेशिंग फीलिंग होती. तब्बू आणि करीना कपूरसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता.'

क्रिती सेनॉन पुढे म्हणाली की, 'मला वाटतं की जेव्हा जेव्हा महिला किंवा मुलींसोबतचा चित्रपट प्रदर्शित होतो. तेव्हा प्रत्येकाला वाटतं की तो खूप गंभीर आहे किंवा काहीतरी मुद्दा असेल किंवा पुरुषांवर टीका होईल वगैरे वगैरे. त्यामुळे या चित्रपटात असे काहीही नाही हे मला स्पष्ट करायचे आहे. महिला खूप चांगली कॉमेडी करू शकतात हे बघायला मिळतं. मला खरोखर आशा आहे की तुम्हाला सर्वांना हा चित्रपट नक्की आवडेल.'

क्रू चित्रपटामध्ये क्रिती सेनॉन, करीना कपूर आणि तब्बू हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा कॅमिओ करताना दिसणार आहेत. बालाजी टेलिफिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन्स नेटवर्क निर्मित 'क्रू' चे दिग्दर्शन राजेश ए. कृष्णन यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या 29 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

Maharashtra News Live Update: CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचा सवाल; तातडीच्या सुनावणीवर प्रश्नचिन्ह

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT