Deepika Padukone Saam Tv
मनोरंजन बातम्या

BAFTA Award 2024 मध्ये Deepika Padukone चा जलवा, अभिनेत्रीच्या देसी लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

Deepika Padukone Desi Look: BAFTA 2024 पुरस्कारांमध्ये दीपिका पदुकोणने भारताचे प्रतिनिधित्व केले. यावेळी दीपिका पदुकोणच्या लूकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. देसी लूकमध्ये दीपिकाने या अवॉर्ड शोला हजेरी लावली. दीपिकाच्या या लूकची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

Priya More

BAFTA Award 2024 :

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आपल्या चित्रपटांसोबतच पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते. नुकताच दीपिका पदुकोणने बाफ्टा अवॉर्डला (BAFTA Award 2024) हजेरी लावली. शनिवारी म्हणजेच १८ फेब्रुवारीला लंडनमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये आयोजित ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स म्हणजेच BAFTA 2024 पुरस्कारांमध्ये दीपिका पदुकोणने भारताचे प्रतिनिधित्व केले. यावेळी दीपिका पदुकोणच्या लूकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. देसी लूकमध्ये दीपिकाने या अवॉर्ड शोला हजेरी लावली. दीपिकाच्या या लूकची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

ग्लोबल स्टार्ससोबत दीपिका पदुकोण प्रेझेंटर म्हणून कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिने दिग्दर्शक जोनाथन ग्लेझर यांना त्यांच्या 'द झोन ऑफ इंटरेस्ट' या चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट चित्रपट नॉट इन द इंग्लिश लँग्वेज' पुरस्कार दिला. या अवॉर्ड शोमध्ये दीपिका पदुकोणने भाषण देखील केले. तिच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत. दीपिका पदुकोणची भाषण आणि पुरस्कार देण्याची शैली सर्वांना आवडत आहे.

दीपिका पदुकोणने बाफ्टा अवॉर्ड शोला देसी लूकमध्ये हजेरी लावली होती. दीपिकाच्या साडी लूकची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. बाफ्टा अवॉर्ड्स 2024 मधील दीपिकाचे साडी लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपिकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. या लूकच्या माध्यमातून तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

बाफ्टा अवॉर्ड्स 2024 मध्ये दीपिका पदुकोणने प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची यांनी डिझाइन केलेली सिल्व्हर कलरची शिमरी साडी आणि मॅचिंग ब्लाउज परिधान केला होता. तिचा लूक खूपच आकर्षक वाटत होता. दीपिका पदुकोणने या साडीवर घातलेले इअररिंग्स देखील सर्वांना प्रचंड आवडले आहे. दीपिकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंना साडेआठ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसंच चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

SCROLL FOR NEXT