Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dabangg 4 Movie: 'चुलबुल पांडे' धुमाकूळ घालायला पुन्हा सज्ज, अरबाज खानने दिली सलमान खानच्या 'दबंग 4'बाबत मोठी अपडेट

Priya More

Dabangg 4:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानचे (Salman Khan) चित्रपट हे त्याच्या चाहत्यांसाठी खास पर्वणी असतात. त्याच्या नवनवीन चित्रपटाची ते आतुरतेने वाट पाहत असतात. अशामध्ये आता सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलमान खानच्या हिट फ्रँचायझी 'दबंग'च्या चौथ्या भागाबाबत एक मोठे अपडेट समोर आली आहे. सलमान खानच्या 'दबंग' (Dabangg Movie) फ्रेंचायझीच्या तीन पार्ट्सनी लोकांचे खूप मनोरंजन केले आहे. सलमान खानचे हे चित्रपट सुपरहिट देखील ठरले. आता त्याचे चाहते चौथ्या पार्टची वाट पाहत आहेत. अशामध्ये आता सलमान खानचा भाऊ आणि 'दबंग' निर्माता अरबाज खानने चित्रपटाच्या चौथ्या भाग म्हणजे 'दबंग 4'बाबत मोठी अपडेट दिली आहे.

सलमान खानच्या 'दबंग 4' चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. आता निर्माता आणि अभिनेता अरबाज खानने त्याचा भाऊ सलमान खानच्या 'दबंग 4' चित्रपटाबाबत मौन सोडले आहे. एका मुलाखतीदरम्यान अरबाज खानने 'दबंग 4' तयार करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अरबाज खान म्हणाला की, जेव्हाही योग्य वेळ येईल तेव्हा 'दबंग 4' हा चित्रपट प्रदर्शित होईल.

अरबाज खान पुढे म्हणाला की, 'सलमान खान आणि तो सध्या त्यांच्या वैयक्तिक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.' दिग्दर्शनाकडे परत येण्याबाबत अरबाज खानने सांगितले की, 'मला 'दबंग 4' दिग्दर्शित करायला आवडेल. परंतु अद्याप काहीही ठरलेले नाही.' याशिवाय अरबाज खानने एटली कुमारला भेटल्याच्या वृत्तावर म्हणाला की, 'ही केवळ अफवा आहे कारण मी कधीही दक्षिणेकडील दिग्दर्शकाला भेटला नाही.'

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, 'दबंग 4' या चित्रपटाव्यतिरिक्त त्याच्याकडे 'द बुल', 'प्रेम की शादी', 'टायगर वर्सेस पठान', 'शेर खान', 'बजरंगी भाईजान 2' असे अनेक चित्रपट आहेत. सलमान खानच्या या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच साजिद नाडियाडवालाने सलमान खानसोबतच्या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगादास करणार असून तो 2024 च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटींची मांदियाळी, भाऊंचं होतंय तोंडभरून कौतुक

Assembly Election: विधानसभेच्या मोर्चेबांधणीत मनसेची आघाडी! दसऱ्यानंतर राज ठाकरेंचा मेळावा; उमेदवारांची घोषणा करणार

Marathi News Live Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

Raigad Crime : रायगड हादरलं! १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार

Viral News: दिल्ली मेट्रोत चाललंय तरी काय? अश्लील डान्सनंतर आता रंगला पत्त्यांच्या डाव; VIDEO पाहून अनेकांचा संताप

SCROLL FOR NEXT