Amimal New Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Animal New Poster: ‘ॲनिमल’च्या गाण्याचे रोमँटिंक पोस्टर रिलीज, लिपलॉक करताना दिसले रश्मिका आणि रणबीर

Rashmika And Ranbir Lip Lock Poster: ‘ॲनिमल’च्या निर्मात्यांनी नुकताच या गाण्याचे पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Priya More

Animal Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या आगामी ‘ॲनिमल’ चित्रपटाची (Animal Movie) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून रश्मिका आणि रणबीर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. आता या चित्रपटातील पहिलं रोमँटिंक गाणं ११ ऑक्टोबर म्हणजे बुधवारी रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी नुकताच या गाण्याचे पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

‘ॲनिमल’ चित्रपटातले पहिलं गाणं 'हुआ मैं' हे ११ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. सध्या निर्मात्यांनी गाण्याशीसंबंधित जास्त माहिती शेअर केलेली नाही. गाण्याच्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना रोमँटिंक अंदाजमध्ये दिसत आहेत. रणबीर आणि रश्मिका एकमेकांना किस करताना दिसत आहेत. प्रेक्षक आतापासूनच चित्रपटातील गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटतील पहिल्या गाण्याचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढली आहे.

रश्मिका मंदानाने देखील आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाण्याचे पोस्टर शेअर केले आहे. तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'हुआ मैं' उद्या रिलीज होणार आहे. हे गाणे आग लावेल. प्रत्येक भाषेतील हे गाणे मला व्यक्तिशः खूप आवडले आहे.' ‘ॲनिमल’ चित्रपटात रश्मिकाने गीतांजलीची भूमिका साकारली आहे.कताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. जो प्रेक्षकांना खूप आवडला होता.

संदीप रेड्डी वंगा यांनी ‘ॲनिमल’ चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संपादन केले आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्यासोबत तृप्ती डिमरी, अनिल कपूर आणि बॉबी देओलही या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज होणार होता. मात्र पोस्ट-प्रॉडक्शनच्या कामात उशीर झाल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT