Animal Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna: 'मी रडत होते, ओरडत होते...', 'अ‍ॅनिमल'मधील 'या' सीननंतर रश्मिका झाली होती खूपच इमोशनल

Animal Movie Shooting: सध्या रश्मिकासोबत या चित्रपटातील सर्व कलाकार चित्रपटाचे यश इन्जॉय करत आहेत. नुकताच रश्मिका मंदान्नाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव शेअर केला.

Priya More

Animal Movie:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor), बॉबी देओल (Bobby Deol), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर ‘ॲनिमल’ चित्रपट (Animal Movie) सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत बक्कळ कमाई केली. तसंच, या चित्रपटाने वर्ल्डवाइड जबरदस्त कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या रश्मिका मंदान्नाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

सध्या रश्मिकासोबत या चित्रपटातील सर्व कलाकार चित्रपटाचे यश इन्जॉय करत आहेत. नुकताच रश्मिका मंदान्नाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव शेअर केला. यावेळी रश्मिकाने संदीप रेड्डी वंगा यांच्या चित्रपटातील त्या एका दृश्याबद्दल सांगितले की, 'तिच्या अभिनयाने ती स्वत: चकित झाली. जेव्हा तिने रणविजयचे पात्र साकारत असलेल्या रणबीर कपूरच्या कानाखाली मारली होती.'

रश्मिका मंदान्नाने पिंकविलाला एक मुलाखत दिली. यावेळी रश्मिकाने सांगितले की, तो सीन शूट करण्यापूर्वी तिला माहिती नव्हतं की ती ते कसं करणार आहे. पण संदीप रेड्डी वंगाने तिला सीन शूट करण्यापूर्वी समजून सांगितले होते. त्यानंतर संपूर्ण सीन एका टेकमध्ये शूट करण्यात आला होता. रश्मिकाने सांगितले की, 'संदीपने मला सांगितले होते की अशा परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीला काय वाटते. फक्त तेच फील कर. मला त्याने सांगितलेले तेवढंच लक्षात होते. अ‍ॅक्शन आणि कट बोलण्यादरम्यान नेमकं काय झालं हे मला अजिबात आठवत नाही. मी प्रोसेस करू शकत नव्हते. माझं डोकं ब्लँक झालं होतं.'

रश्मिकाने पुढे सांगितले की, 'सीन शूट केल्यानंतर खरं तर मी रडत होते. कारण मी त्याच्या कानाखाली मारली होती, मी ओरडत होतो... मग मी रणबीरकडे गेले आणि त्याला विचारले की हे योग्य होते का? तू ठीक आहेस ना? त्यानंतर संदीपलाही विचारले की, मी योग्य केले ना.' रश्मिका पुढे म्हणाली, '8-9 मिनिटांचा दीर्घ शॉट मी एका टेकमध्ये पूर्ण करू शकल्याचा मला आनंद झाला आणि 'अ‍ॅनिमल' चित्रपटात काम केल्यामुळे मला एक अभिनेत्री म्हणून खूप उंची मिळाली.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

SCROLL FOR NEXT