Akshay Kumar Starrer Mast Malang Jhoom Song Released From Movie Bade Miyan Chote Miyan | Saam Tv Marathi Bollywood News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bade Miyan Chote Miyan Movie मधील नवं गाणं आऊट, 'मस्त मलंग झूम'वर अक्षय कुमार- टायगर श्रॉफचा अफलातून डान्स

Mast Malang Jhoom Song Out From Movie Bade Miyan Chote Miyan: नुकताच निर्मात्यांनी या चित्रपटातील दुसरं आणि नवं गाणं रिली केलं आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील 'मस्त मलंग झूम' (Mast Malang Jhoom Song) हे पार्टी साँग नुकताच रिलीज झाले असून या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

Priya More

Mast Malang Jhoom Song Out:

बॉलिवूड (Bollywood) स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan Movie) या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. दोघांचेही चाहते त्यांच्या या चित्रपटाच्या रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. दोन्ही कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशामध्ये निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

नुकताच निर्मात्यांनी या चित्रपटातील दुसरं आणि नवं गाणं रिली केलं आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील 'मस्त मलंग झूम' (Mast Malang Jhoom Song) हे पार्टी साँग नुकताच रिलीज झाले असून या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. अवघ्या काही तासांमध्येच हे गाणं युट्यूबवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

'मस्त मलंग झूम' या गाण्यामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सूट आणि बूट परिधान करून जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. एकीकडे या गाण्यामध्ये अक्षयचा स्वॅग पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे टायगर श्रॉफ आपल्या डान्सिंग मूव्ह्सने सर्वांना प्रभावित करताना दिसत आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' मधील 'मस्त मलंग झूम' हे नवीन गाणे रिलीज होताच इंटरनेटवर चांगलेच लोकप्रिय झाले आहे.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ 'मस्त मलंग झूम' या गाण्यात कधी स्टाईलने तर कधी मस्ती करत नाचताना दिसत आहेत. या गाण्यात अक्षय कुमारने टायगर श्रॉफच्या डान्सिंग स्टेप्स ज्या पद्धतीने जुळवल्या आहेत ते पाहण्यासारखे आहे. 'मस्त मलंग झूम' गाण्यात सोनाक्षी सिन्हा देखील दिसत आहे. सोनाक्षीने पिवळी साडी नेसून तिच्या स्टाईलने संपूर्ण गाण्याला प्रसिद्धी दिली आहे.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या चित्रपटातील गाणे रिलीज होताच इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' मधील 'मस्त मलंग झूम' हे पार्टी साँग झी म्युझिक कंपनीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर शेअर केले आहे. हे गाणँ शेअर करत कॅप्शन असे लिहिले आहे की, 'एनर्जी- मस्त, बीट्स- मलंग, ग्रूव- झूम. मस्त मलंगच्या तालावर नाचण्याची वेळ आली आहे...' हे गाणं अरिजित सिंग, विशाल मिश्रा आणि निखिता गांधी यांनी गायलं असून विशाल मिश्राने या गाण्याला संगीत दिले आहे. तर इर्शाद कामिल यांनी गाणं लिहिलं आहे.

दरम्यान, पूजा एन्टरटेन्मेंट आणि एएझेड फिल्म्स निर्मित, अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट याच वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sudden cardiac death: अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू का होतो? कधीच समजून येत नाहीत पण संकेत देणारी कारणं

BJP Leader Killed : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Yavatmal Politics: ठाकरे गटाच्या 13 पदाधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी; काय आहे प्रकरण?

Pune Honeytrap: PMPML मधील कंडक्टर महिलेचा प्रताप, तिघांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं, आता स्वतःच अडकली

टॉयलेटमध्ये तासनतास फोन घेऊन बसल्याने होऊ शकतात 'या' आरोग्याच्या समस्या

SCROLL FOR NEXT