Shaitaan Box Office Day 4 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shaitaan Box Office Day 4: सोमवारीही पाहायला मिळाली 'शैतान'ची जादू, कमाईचा आकडा ६० कोटी पार

Ajay Devgn And R Madhvan : 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला शैतान चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्याच विकेंडला चांगली कमाई केली आहे. त्यानंतर सोमवारी देखील या चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे.

Priya More

Shaitaan Movie:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) आणि आर माधवन (R Madhvan) स्टारर 'शैतान' चित्रपटाची (Shaitaan Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत आहे. या चित्रपटाद्वारे अजय देवगण पुन्हा फॅमिली मॅनच्या अंदाजमध्ये दिसत आहे. तर आर माधवन शैतानच्या भूमिकेत सर्वांना प्रचंड आवडत आहे. एंटरटेन्मेंटचा फुल पॅकेज असलेला हा चित्रपट दिवसेंदिवस चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या चार दिवसांत ५० कोटींपार कमाई केली आहे.

8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला शैतान चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्याच विकेंडला चांगली कमाई केली आहे. त्यानंतर सोमवारी देखील या चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. विकास बहल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत असून ते चित्रपटाचे कौतुक करत आहे. या चित्रपटाने चार दिवसांत बक्कळ कमाई केली आहे.

अजय देवगणच्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 15.21 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईने उंच उडी घेतली आणि 27.12 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी ‘शैतान’च्या कमाईमध्ये चांगली वाढ झाली. रविवारी या चित्रपटाने 20.74 कोटींची कमाई केली. सोमवारी या चित्रपटाने 7.81 कोटी रुपयांची कमाई केली. अशापद्धतीने या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 62.94 कोटींवर पोहोचली आहे.

दरम्यान, बॉक्स ऑफिसवर असं पहिल्यांदा घडत आहे की, एखादा हॉरर चित्रपट अशापद्धतीने कमाई करत आहे. शुक्रवारी महाशिवरात्रीच्या दिवशी रिलीज झालेल्या या चित्रपटाने सुट्टीच्या दिवसाचा चांगला फायदा करून घेतला आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन सुट्टीचे असल्यामुळे या चित्रपटाला चांगला फायदा झाला. सोमवारी या चित्रपटाची कमाई कमी झाली असली तरी देखील या चित्रपटाने कमाईचा आकडा 60 कोटी पार केला आहे. शैतान चित्रपटाच्या समोर दुसरा कोणाताच मोठा चित्रपट नाही. कोणतीही स्पर्धा नसल्यामुळे या चित्रपटाला चांगला फायदा होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT