Sushmita Sen And Rohman Shawl Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sushmita Sen With Ex Boyfriend: हातात हात आणि चेहऱ्यावर स्माइल..., सुष्मिता सेन आणि रोहमनचं पॅचअप, दिवाळी पार्टीचा VIDEO व्हायरल

Priya More

Sushmita Sen Viral Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते. सुष्मिता सेन आता पुन्हा चर्चेत आली आहे त्यामागचे कारण म्हणजे अभिनेत्री तिच्या एक्सबॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत दिसली.

'आर्या ३' वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या सुष्मिता सेनचा व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुष्मिता तिच्या एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत खूपच आनंदित दिसत आहे.

नुकत्याच झालेल्या एका दिवाळी पार्टीत सुष्मिता सेन तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत दिसली. दोघांना पुन्हा एकत्र पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले. हातात हात आणि चेहऱ्यावर स्माइल असणाऱ्या सुष्मिता आणि रोहमनला पाहून दोघांमध्ये पुन्हा पॅचअप झाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात याची कोणालाच कल्पना नव्हती. पण जेव्हा सुष्मिता रोहमन शॉलचा हात धरून दिवाळी पार्टीत पोहोचली तेव्हा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि आनंदही झाला.

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत. सगळीकडे दोघांच्याच नावाची चर्चा सुरू आहे. २०२१ मध्ये जेव्हा सुष्मिताने रोहमन शॉलसोबत ब्रेकअपची घोषणा केली तेव्हा चाहत्यांचे मन दुखावले गेले होते. ब्रेकअप होण्यामागचे या कपलने कोणतेही कारण सांगितले नव्हते. पण ब्रेकअपनंतरही रोहमन शॉल सुष्मिताच्या आयुष्याचा एक भाग राहिला. तो अनेकदा सुष्मिता आणि तिच्या मुलींसोबत हँग आउट करताना दिसला आहे.

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ब्लॅक कलरची सुंदर साडी नेसलेली सुष्मिता सेन रोहमन शॉलचा हात पकडून चालताना दिसत आहे. दोघेही एकत्र खूप क्यूट दिसत आहेत. सुष्मिताला साडीत चालायला त्रास होत असल्याने रोहमन शॉल तिचा हात धरून चालत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी सुष्मिता सेन खूपच आनंदी होती आणि रोहमन देखील तिची काळजी घेताना दिसला. दोघांनी फोटोंसाठी पापाराझींना अनेक पोझ देखील दिल्या.

सुष्मिता आणि रोहमनचा व्हिडीओ पाहून दोघांचे चाहते त्यांना 'तुम्ही दोघे आता एकत्र आहात का?' असा प्रश्न विचारत आहेत. पण सुष्मिता आणि रोहमनला एकत्र पाहून दोघांचेही चाहते खूश झाले आहेत. दरम्यान, डिसेंबर २०२१ मध्ये सुष्मिता सेनने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आणि रोहमन शॉल वेगळे झाल्याची घोषणा केली होती. तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी ब्रेकअप केला होता. २०१८ मध्ये रोहमनने सुष्मिताला इन्स्टाग्रामवर मेसेज केला होता. त्यानंतर दोघांच्या नात्याची सुरूवात झाली आणि दोघेही एकत्र राहू लागले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT