sunny leone Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mere Piya Ghar Aaya 2.0 Teaser: माधुरी दीक्षित च्या 'मेरा पिया घर आया 2.0' मध्ये झळकणार सनी लिओनी, गाण्याचा टीझर रिलीज

Sunny Leone New Song: 'मेरा पिया घर आया २.०' या गाण्याच्या (Mere Piya Ghar Aaya 2.0 Song) माध्यमातून सनी लिओनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Priya More

Sunny Leone New Song:

बॉलिवूडची (Bollywood) हॉट अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) काही महिन्यांपूर्वी 'Kennedy' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटामध्ये सनी लिओनीने अभिनेता राहुल भट्टसोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटानंतर आता सनी लिओनी आपल्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी एक आयकॉनिक डान्स नंबरला रिक्रिएट करत माधुरी दीक्षितला ट्रिब्यूट देताना दिसणार आहे. 'मेरा पिया घर आया २.०' या गाण्याच्या (Mere Piya Ghar Aaya 2.0 Song) माध्यमातून सनी लिओनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यासाठी सनीचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

अभिनेत्री सनी लिओनी अफलातून गाणं घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याच्या माध्यमातून बॉलीवूडच्या रसिकांना सनी लिओनीचा एक रोमांचक आणि आनंददायक परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे. माधुरी दीक्षितने एकेकाळी सादर केलेला प्रसिद्ध डान्स नंबर पुन्हा तयार करण्यासाठी सनी लिओनी तयार झाली आहे.

बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर 'मेरा पिया घर आया २.०' या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हे गाणं ८ ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. १९९५ चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'याराना' मधील माधुरी दीक्षितचे हे गाणं खूपच सुपरहिट ठरलं होतं. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली प्रसिद्धी मिळाली होती.

सनी लिओनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'मेरा पिया घर आया २.०' गाण्याचा जबरदस्त टीझर शेअर केला आहे. या गाण्यामध्ये सनीचा जबरदस्त लूक सर्वांना पाहायला मिळत आहे. टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये सनीने असे लिहिले आहे की, 'हे जगासोबत शेअर करताना खूप अभिमान वाटतो! माधुरी दीक्षितच्या गाण्याचा रिमेक करणे हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान होता.' सनी लिओनीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे.

आता 'मेरा पिया घर आया २.०'च्या माध्यमातून आपल्या तालावर प्रेक्षकांना नाचवण्यासाठी सनी लिओनी सज्ज झाली आहे. या गाण्याच्या माध्यमातून सनी लिओनीचे अप्रतिम नृत्य चाहत्यांना मोहित करणारे असणार आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांनी हा डान्स कोरिओग्राफ केला आहे. 'मेरा पिया घर आया' या गाण्याच्या रिमेकची चर्चा सगळीकडे होत होती. आता हे गाणं कधी रिलीज होणार याकडे सनी आणि माधुरीच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि गरोदर मातांना निकृष्ट आहार

VIRAL VIDEO : बाबोSSS...दुबईतील शाळांची फी किती? विद्यार्थीनीच्या आईने सांगितला अविश्वसनीय आकडा, बघून डोळे पडतील पांढरेफट्ट

Sukanya Samruddhi Yojna : Sukanya Samruddhi Yojna: मुलींच्या भविष्यासाठी आताच निर्णय घ्या, सुकन्या समृद्धी योजनेत अशी करा गुंतवणूक?

Railway Accident : हायकोर्टाचा मोठा निर्णय! रेल्वेत चढताना पडून मृत्यू झाला तरी भरपाई मिळणार

Rahul Gandhi: राहुल गांधी पुन्हा आक्रमक, दिल्लीतील पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT