Sonam Kapoor House Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonam Kapoor House: सोनम कपूरचे सासरचं घर आहे खूपच आलिशान, 173 कोटींच्या घराचे इनसाइड फोटो पाहतच राहाल

Priya More

Sonam Kapoor House Inside Photos:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आपल्या चित्रपटांपेक्षा लक्झरी लाइफमुळे चांगलीच चर्चेत असते. नेहमी महागडे कपडे, कार आणि तिच्या आलिशान घराची ती झलक दाखवत असते. सोनम कपूर कधी इंडियात तर कधी लंडनमध्ये पतीसोबत राहते. सोनम कपूर नेहमी आपल्या आलिशान घरामध्येच फोटोशूट करत सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या फोटोंसोबत तिच्या घराचे सौंदर्य देखील चाहत्यांना प्रचंड आवडते. नुकताच सोनम कपूरने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत दिल्लीमधील आपल्या आलिशान घराची (Sonam Kapoor House) झलक दाखवली आहे. तिचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

दिल्लीमध्ये सोनम कपूरचे सासर म्हणजेच आनंद अहूजाचे घर आहे. दिल्लीतील पॉश एरियामध्ये तिचे हे घर आहे. दिल्लीशिवाय सोनमचे मुंबई आणि लंडनमध्ये देखील आलिशान घर आहे. ती दिल्ली- मुंबई आणि लंडनला सतत ये-जा करत असते. पण ती दिल्लीच्या घरी क्वचितच जात असते. सोनमने नुकताच दिल्लीतील घरी एका ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी तिने आपल्या दिल्लीतील आलिशान घराचे फोटो शेअर केले आहे. एखाद्या राजमहलापेक्षाही सुंदर सोनम कपूरचे हे दिल्लीतील घर आहे.

सोनम कपूरने तिच्या दिल्लीतील घरी एका ग्रँड लंच पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीची थीम इंडियन-मॉर्डन अशी होती. सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर यावेळीचे काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनम कपूरच्या घराचा इनसाइड लूक पाहायला मिळत आहे. फोटो शेअर करताना सोनमने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'भारताच्या विपुलतेबद्दल बोलणारे एक लंच. धन्यवाद, सिया, इरा, मला आमच्या देशाचे वैशिष्ट्य आमच्या पाहुण्यांसमोर सुंदरपणे मांडण्यात मदत केल्याबद्दल धन्यवाद. करण, रजनीत आणि मारुत यांचे आभार.'

सोनम कपूरने पुढे लिहिले की, 'माझ्यासाठी हा खास ड्रेस डिझाईन केल्याबद्दल माझा चांगला मित्र कुणाल रावलचे आभार. हा माझ्या आजवरच्या आवडत्या ड्रेसपैकी एक आहे. हे खरोखरच आधुनिक भारताचे प्रतिबिंब आहे.' सोनम कपूरच्या या पोस्टवर तिचे वडील अर्थात अभिनेते अनिल कपूरने कमेंट्स करत लिहिले की, 'उत्कृष्ट आदरातिथ्य, उत्कृष्ट लंच, तू आणि आनंदने स्वतःला मागे टाकले आहे.'

सोनम कपूरने यावेळी निळ्या रंगाचे जॅकीट आणि मॅचिंग स्कर्ट घातलेला. सोनम कपूरने या लूकमध्ये आपल्या आलिशना घरामध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. यावेळी सोनम कपूर एका कन्सोल टेबलसमोर पोज देताना दिसत आहे. ज्यावर नंदीची मूर्ती ठेवली आहे. या फोटोंमध्ये सोनममे तिच्या डायनिंग एरियाची झलक दाखवली आहे. त्यांचा डायनिंग टेबल लाकडी आहे. हा डायनिंग टेबल हिरवाईने सजवलेले असून त्यावर मेणबत्त्या, चांदीच्या हत्तीच्या मूर्ती आणि लाल पानांच्या फुलदाण्यांनी तो सजवलेले आहे. त्याच्या वर एक मोठा झूमर आहे. तिच्या घराचा हा डायनिंग एरिया खूपच मनमोहक आहे.

सोनम कपूरच्या दिल्लीतील या आलिशान घराची किंमत 173 कोटी रूपये इतकी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या या घराची किंमत 173 कोटी रुपये आहे. हे दिल्लीच्या पृथ्वीराज रोडवर आहे. सोनम कपूरच्या दिल्लीतील या घराच्या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. त्याचसोबत ते तिच्या फोटोंचे देखील कौतुक करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT