Stree 2 Collection  Saam TV
मनोरंजन बातम्या

Stree 2 Worldwide Collection: जभरामध्ये 'स्त्री २'ची जादू कायम, ३०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Stree 2 Box Office Collection: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या चित्रपटाने भारतामध्ये २०० कोटींपार कमाई केली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पाच दिवसांमध्ये २७५. ५ कोटींची कमाई केली.

Priya More

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव स्टारर 'स्त्री २' चित्रपटची बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत आहे. हा चित्रपट दररोज कमाईचे नवीन रेकॉर्ड बनवत आहे. १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला हा हॉरर-कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिससह जगभरामध्ये दमदार कमाई केली आहे. या चित्रपटाने ३०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे.

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या चित्रपटाने भारतामध्ये २०० कोटींपार कमाई केली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पाच दिवसांमध्ये २७५. ५ कोटींची कमाई केली. या चित्रपटाने जगभरतामध्ये पाचव्या दिवशी ४७ कोटींची कमाई केली. या चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई ३२२.५ कोटी इतकी झाली आहे.

या चित्रपटाने भारतात २०० कोटींच्या क्लबमध्ये आणि जगभरामध्ये ३०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. स्त्री २ चित्रपट सहाव्या दिवशी ३५० कोटींपेक्षा जास्त कमाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 'स्त्री २' चे जबरदस्त कलेक्शन हे दाखवत आहे की हा चित्रपट या वर्षातील सर्वात सुपरहिट ठरू शकतो.

'स्त्री २' चित्रपटाने अक्षय कुमारच्या 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहमच्या 'वेदा' चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आहे. अक्षय कुमार, तापसी पन्नू, फरदीन खान, वाणी कपूर यांच्या 'खेल खेल में' या चित्रपटाने ५ दिवसांत बॉक्स ऑफिसवर १५.९५ कोटींचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने केवळ ५ कोटींच्या कलेक्शनपासून सुरुवात केली होती.

तर, जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांच्या 'वेदा' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाचे एकूण कलेक्शन १५.५० कोटी रुपये इतके झाले आहे. वेदाने ६.३ कोटींच्या कलेक्शनपासून सुरुवात केली होती. 'वेदा' चित्रपट ३ भाषांमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये रिलीज झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महापालिका निवडणुकांसाठी दोन पक्षांची युती, एकत्र लढणार, पुढच्या बैठकीत ठरणार प्लान

Maharashtra Politics: गणपती दर्शनाआधी एकनाथ शिंदे–राज ठाकरे यांची बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा|VIDEO

Maharashtra Live News Update: उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानींचा आत्महत्येचा प्रयत्न

Maharashtra Government: राज्यातील शिक्षकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, टप्पा अनुदानाला मंजुरी

Mithila Palkar: मिथिला पालकरच्या सौंदर्याची जादू, साडीतील फोटोंनी केले घायाळ

SCROLL FOR NEXT