Ranbir Kapoor And Rashmika Mandanna Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor ने 'ॲनिमल'च्या ट्रेलर लाँचवेळी Rashmika Mandanna ला कोपरा का मारला?, VIDEO होतोय व्हायरल

Ranbir Kapoor And Rashmika Mandanna Video: रश्मिका उत्तर देताना रणबीरने रश्मिकाला कोपरा मारला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Priya More

Animal Movie Trailer Launch:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना यांचा बहुप्रतीक्षित 'ॲनिमल' चित्रपट (Animal Movie) सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'ॲनिमल'चा धमाकेदार ट्रेलर दिल्लीतील एका शानदार कार्यक्रमात लाँच करण्यात आला. या ट्रेलरमधील रणबीरचा लूक आणि अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. या ट्रेलर लाँचला चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट पोहचली होती आणि त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कार्यक्रमादरम्यान, रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी रश्मिका मंदान्नाला चित्रपटाविषयी प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना रश्मिका रणबीरसोबत चित्रपटात काम करण्यचा अनुभव सांगताना दिसली. रश्मिका उत्तर देताना रणबीरने रश्मिकाला कोपरा मारला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा रश्मिका एका प्रश्नाचे उत्तर देते आणि यादरम्यान ती रणबीरचे नाव घेते तेव्हा ती त्याच्याकडे पाहते आणि रणबीर सर किंवा रणबीर म्हणते. हे पाहून सगळे हसू लागतात. ती पुढे रणबीरसोबतचा चित्रपटातील अनुभव सांगते आणि पुन्हा ती रणबीरला सर म्हणते. त्यानंतर रणबीर हासत हासत रश्मिकाला कोपराने मारतो.

या मुलाखतीमध्ये रश्मिकाने सांगितले की, रणबीरसोबत काम करून तिला एक गोष्ट शिकायला मिळाली आणि ती म्हणजे फायनल शूटिंग करण्यापूर्वी कोणत्याही सीनची रिहर्सल करणे किती महत्त्वाचे असते. दरम्यान, दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे हा ट्रेलर लाँच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी चित्रपटातील नायक आणि खलनायक दोघांनाही पाहण्यासाठी दिल्लीकरांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीला आवरणे कठीण झाले होते. रणबीर आणि बॉबी या दोघांनीही चाहत्यांना निराश केले नाही. तर ते आपल्या कारवर उभं राहून चाहत्यांना भेटले. हा चित्रपट येत्या 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT