Rakhi Sawant Video Saam tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Video: 'आज खऱ्या रूपात आलीस तू', रावणासारखा दहा तोंडांचा मुखवट लावून रस्त्यावर फिरणारी राखी सावंत ट्रोल

Rakhi Sawant Ravan Look: राखी सावंत रावणासारखं दहा तोंडाचा मुखवटा लावून रस्त्यावर फिरली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे.

Priya More

Rakhi Sawant New Look:

बॉलिवूडची (Bollywood) 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) या नाही तर त्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी आपल्या हटके ड्रेसिंग स्टाईलमध्ये तर कधी आपल्या वक्तव्यांमुळे तिची नेहमी चर्चा होते. पण सध्या राखी सावंत चर्चेत येण्यामागचं कारण जरा वेगळंच आहे.

दसऱ्याच्या दिवशी राखी सावंतने असं काही केलं की सध्या तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. राखी सावंत रावणासारखं दहा तोंडाचा मुखवटा लावून रस्त्यावर फिरली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संपूर्ण देशभरात दसऱ्याचा सण उत्साहात साजरा केला गेला. ठिकठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर दुसरीकडे दसऱ्याच्या दिवशी राखी सावंत रावणासारखं दहा तोंड लावून रस्त्यावर फिरत होती. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर राखीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, राखी सावंतने रावणासारखं 10 डोकी असलेला मुखवटा घातला आहे आणि तिच्या हातात धनुष्य आणि गदाही दिसत आहे. राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राखी सावंतचा रावणाचा लूक पाहून नेटिझन्स हसत आहेत. तिला प्रचंड ट्रोलही करण्यात येत आहे.

एका यूजरने राखी सावंतच्या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, 'आज ती तिच्या खऱ्या रूपात आली आहे.' दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'हिला पाहून रावण स्वत: आत्महत्या करेल.' तिसऱ्या यूजरने लिहिले की, 'आज हिचापण वध झाला पाहिजे.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'हे पाहून रावणही पळून जाईल.' राखी सावंतचा रावण अवतार पाहून नेटिझन्सनी ट्रोल करत तिची चांगलीच शाळा घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Mumbai Leopard : मीरा भाईंदरच्या हायप्रोफाईल सोयटीत घुसला बिबट्या; ३ जणांवर केला हल्ला, अंगाचे लचके तोडले अन्...

Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरी दीक्षितची लाफ्टर शेफ्समध्ये एन्ट्री; सीरियल किलर 'मिसेज देशपांडे' देणार जेवण बनवण्याचे धडे

Tur Dal Sambar Recipe: तुरीच्या डाळीचा साऊथ इंडियन स्टाईल सांबर कसा बनवायचा?

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले; २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT