Rakhi Sawant On Anant Ambani Pre Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: 'मी भांडी घासली असती... फरशी पुसली असती', अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला न बोलावल्यामुळे राखी सावंत रुसली

Rakhi Sawant On Anant Ambani Pre Wedding: सोशल मीडियावर राखीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगला न बोलावल्यामुळे राखी सावंत अंबानी फॅमिलीवर नाराज झाली आहे.

Priya More

Rakhi Sawant Viral Video:

बॉलिवूडची (Bollywood) 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) या नाही तर त्या कारणांमुळे चर्चेत असते. राखी सावंत सध्या आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. निकाह आणि नंतर तलाक यामुळे राखी सावंत सध्या चर्चेत आहे. तलाक झाल्यानंतर राखी सावंत शांत होती पण आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर राखीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगला (Anant Ambani And Radhika Merchant Pre-Wedding) न बोलावल्यामुळे राखी सावंत अंबानी फॅमिलीवर नाराज झाली आहे. रूसलेल्या राखी सावंतने व्हिडीओ पोस्ट करत प्री-वेडिंगला न बोलावल्याचा राग काढला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत असे म्हणते की, 'अंबानीजी नमस्कार... तुम्ही मला लग्नाला का नाही बोलावले. तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही मला लग्नाला बोलावले असते तर मी फ्लोअर तोडला असता खुर्च्या तोडल्या असत्या. माझा डान्स आतापर्यंत तुम्ही पाहिला नाही. तुम्ही रिहाना, एकोन या लोकांना बोलावले. हे सगळे माझ्यासमोर शेंगदाणे आहेत. तुम्ही मला का नाही बोलावले. तुम्ही या सगळ्यांना बोलावून हजारो-कोटी रुपये दिले. तरीही रिहाना फाटलेले कपडे घालून आली होती. मी आले असते तर हॉट आणि सेक्सी कपडे घालून आले असते.'

राखी सावंत पुढे म्हणते की, 'माझ्या कपड्याने मी लादी देखील पुसली असती, मला बोलवण्याचे चार-चार फायदे होते. मी एन्टरटेन केले असते, मी डान्स केला असता, तुमचे जे कुणी पाहुणे आले आहेत. जेवल्यानंतर त्याचे प्लेट देखील घासले असते, सर्वांचे रुम साफ केले असते. काय काय नसते केले मी. तुम्ही हे हजरो-करोड रुपये खर्च करून कोणाला बोलावले. तुम्ही राखी सावंतला नाही बोलावले हे काय केले तुम्ही.'

राखी सावंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वजण पोट धरून हसत आहेत. या व्हिडीओवर नेटिझन्स मजेशीर कमेंट्स देखील करत आहेत. दरम्यान, अनंत-राधिकाचे प्री-वेडिंग फंक्शन जामनगर येथे पार पडले. या कार्यक्रमाला बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला न बोलावल्यामुळे राखी सावंत रुसली असून तिने व्हिडीओद्वारे आपल्या मनातील राग व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : मोठी बातमी! मंत्री माणिकराव कोकाटेंना अटक होणार, वॉरंट निघाले

Latest Blouse Hand Designs: या 5 पॅटर्नमध्ये ब्लाऊजच्या हाताची डिझाईन शिवा, कोणतीही साडी नेसली तरी सुंदरच दिसेल

KDMC News : राज ठाकरेंना आणखी एक धक्का, शहराध्यक्षांचा मनसेला जय महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: परभणीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील दोन्ही गट स्वबळावर लढण्यासाठी ठाम

Hair Care: हजारो रुपयांच्या केराटिन ट्रीटमेंट्स कशाला? या ७ घरगुती कंडिशनरने केस बनवतील सिल्की आणि सॉफ्ट

SCROLL FOR NEXT