Priyanka Chopra In Mumbai Saam TV
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra In Mumbai: प्रियांका चोप्रा मुंबईत पोहचली, मुलगी मालतीच्या नावाच्या पेडेंटने वेधलं लक्ष; VIDEO होतोय व्हायरल

Priyanka Chopra Airport Look: प्रियांका मुंबईत येणार असल्यामुळे तिचे चाहते खूपच आनंदी झाले होते. अखेर ती आज मुंबईत पोहचली.

Priya More

Priyanka Chopra Host MAMI Film Festival: बॉलिवूड (Bollywood) ते हॉलिवूड (Hollywood) गाजवणारी 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या चर्चेत आहे. जिओ MAMI फिल्म फेस्टिव्हल 2023 साठी (Jio MAMI) प्रियांका चोप्रा नुकताच मुंबईत दाखल झाली. प्रियांकाने गुरूवारी सोशल मीडियावर पोस्ट करत मुंबईत येत असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. प्रियांका मुंबईत येणार असल्यामुळे तिचे चाहते खूपच आनंदी झाले होते. अखेर ती आज मुंबईत पोहचली.

प्रियांका चोप्रा मुंबई एअरपोर्ट बाहेर येताच तिला पापाराझींनी घेरले. प्रियांका तिच्या टीमसोबत एकटीच भारतात आल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी प्रियांकासोबत तिचा पती निक जोनास आणि तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास दिसले नाहीत. प्रियांका चोप्राचा एअरपोर्टवर दाखल झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

एअरपोर्ट लुकसाठी प्रियांकाने ऑल-ब्लॅक कॅज्युअल आउटफिट घातला होता. अभिनेत्रीने ब्लॅक कलरचा लाँग कोट आणि पँटसह काळ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला होता. प्रियांकाने काही अॅक्सेसरीजसह तिचा लूक पूर्ण केला होता. यावेळी प्रियंकाने गळ्यामुळे मुलगी मालतीच्या नावाचे पेडेंट घातले होते. या पेडेंटनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रियांका चोप्राचा एअरपोर्ट लूक सर्वांना प्रचंड आवडला. तिचा एअरपोर्ट व्हिडिओ पापाराझींनी सोशल मीडियावर शेअर केला आहे जो व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये ती मुंबई एअरपोर्ट टर्मिनलमधून बाहेर पडताना दिसत आहे. यादरम्यान फोटोग्राफर्स प्रियांकाला फोटो काढण्यासाठी घेरताना दिसत आहेत. काही लोकं अशीही दिसत आहेत जे हा प्रसंग कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान प्रियांकाने देखील पापाराझींना जबरदस्त पोज दिल्या आणि सर्वांना हात जोडून नमस्कार केला.

प्रियांका चोप्राचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून एका चाहत्याने लिहिले की, 'तू खूप सुंदर आहे'. आणखी एका चाहत्याने सांगितले, 'ती आजच्या नवीन अभिनेत्रींपेक्षा तरुण दिसते... खूप सुंदर'. त्याचवेळी आणखी एका चाहत्याने लिहिले की, 'प्रियांकाने तिची बॉडी खूप चांगली मेंटेन ठेवली आहे'. प्रियांका चोप्रा आजपासून सुरू होणाऱ्या MAMI म्हणजेच मुंबई फिल्म फेस्टिव्हलसाठी मुंबईत आली आहे. या इव्हेंटची ओपनिंग नाईट प्रियांका चोप्रा होस्ट करणार आहे. मुंबईतल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT