Parineeti And Raghav Wedding Venue Video Instagram
मनोरंजन बातम्या

Parineeti And Raghav Wedding: परिणीती-राघवच्या लग्नाला उरले काही तासच, वेडिंग वेन्यूचा Inside Video आला समोर

Parineeti And Raghav Wedding Venue Video: या लग्नाबाबत परिणीती आणि राघव दोघांचे (Parineeti And Raghav Wedding) चाहते खूपच उत्सुक आहेत.

Priya More

Parineeti Chopra And Raghav Chadha Wedding:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) आज विवाहबंधनात अडकणार आहेत. अवघ्या काही तासांमध्येच परिणीती चोप्रा राघव चड्ढाची पत्नी होणार आहे. उदयपूरच्या लीला पॅसेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नासाठी उदयपूरमध्ये पाहुण्याचे येणं सुरूच आहे.

अशामध्ये विमानतळापासून हॉटेल लीला पॅलेसपर्यंत पाहुण्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. या लग्नाबाबत परिणीती आणि राघव दोघांचे (Parineeti And Raghav Wedding) चाहते खूपच उत्सुक आहेत. ते या लग्नाबाबत प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. अशामध्ये परिणीती आणि राघवच्या वेडिंग वेन्यूचा इनसाइड व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर राघव आणि परिणीच्या लग्नाच्या ठिकाणाचा म्हणजे हॉटेल लीला पॅसेजच्या आतमधील व्हिडिओ लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये हॉटेलच्या आतमधील आलिशान दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. यासोबतच राघव चड्ढा यांचे काकाही व्हिडीओमध्ये दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की हॉटेलमध्ये पाहुण्यांना बसण्यासाठी खास व्यवस्थाही करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये आजूबाजूला पूल दिसत आहेत. त्याचसोबत सुंदर हिरवेगार बगीचा असे खूपच सुंदर दृश्य दिसत आहे. या हॉटेलमध्ये लग्नासाठी आतमध्ये करण्यात आलेली व्यवस्था देखील दिसत आहे.

परिणीती आणि राघवच्या लग्नाबाबतचे आणखी काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या पाहुण्यांना खास बोटीतून लग्नाच्या ठिकाणी हॉटेलमध्ये नेले जात आहे. तलावांचे शहर असलेल्या उदयपूरचा हा व्हिडिओ खूपच खास आहे. ज्यामध्ये सेलिब्रिटी पाहुणे बोटीतून लग्नाच्या ठिकाणी जाताना दिसत आहेत. हा नजारा देखील खूपच सुंदर आहे.

दरम्यान, परिणीती आणि राघव 24 सप्टेंबरला म्हणजे आज लग्न करणार आहेत. या लग्नासाठी आतापर्यंत अनेक पाहुणे आल्याची माहिती आहे. या पाहुण्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजता ताज लेक पॅलेस येथून लीला पॅलेससाठी मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर लीला पॅलेसमध्ये राघव आणि परिणीती विवाहबंधनात अडकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT