Kangana Ranaut On Urmila Matondkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: ऐवढा सन्मान जगात कुणालाच मिळत नाही..., उर्मिला मातोंडकरवरील वक्तव्यावर कंगना रनौतचे स्पष्टीकरण

Kangana Ranaut On Urmila Matondkar: कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने २०२० मध्ये बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरविरोधात (Urmila Matondkar) आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

Priya More

Kangana Ranaut Statement:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या चांगलीच चर्चेत आहे. अभिनयानंतर कंगना रनौतने नुकताच राजकारणामध्ये एन्ट्री घेतली. कंगनाला भाजपकडून (BKP) उमेदवारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) मंडी मतदार संघातून कंगना भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे. कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने २०२० मध्ये बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरविरोधात (Urmila Matondkar) आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तिने उर्मिलाला सॉफ्ट पॉर्नस्टार म्हटले होते. तिचा हा व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरून कंगनावर टीका केली जात आहे. अशामध्ये आता कंगना रनौतने पॉर्नस्टारवाल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सनी लिओनीचे नाव मध्ये घेतले आहे.

कंगना रनौतचा व्हायरल होणारा व्हिडीओ २०२० मधील आहे. ज्यामध्ये कंगना रनौतने एका न्यूज चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये ती म्हणते की, 'मी उर्मिता मातोंडकरची एक खूपच अपमानास्पद मुलाखत पाहिला. ती ज्यापद्धतीने माझ्याबद्दल बोलत होती, माझी मस्करी करत होती, माझ्या संघर्षाची खिल्ली उडवत होती. मी तिकीटासाठी भाजपला खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा माझ्यावर आरोप करत होती.'

कंगना या व्हिडीओमध्ये पुढे म्हणाली होती की, 'माझ्यासाठी तिकीट मिळवणे फार कठीण नाही हे समजून घेण्यासाठी प्रतिभावान असण्याची गरज नाही. उर्मिला एक सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. ती तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते? ते म्हणजे सॉफ्ट पॉर्नसाठी. जर तिला तिकीट मिळत असेल तर मला तिकीट का नाही मिळणार?'

कंगनाने उर्मिला मातोंडकरसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर स्पष्टिकरण देत असताना सनी लिओनीचे नाव मध्ये घेतले आहे. कंगना रनौतने टाइम्स नाऊ समिटमध्ये बोलताना सांगितले की, सॉफ्ट पॉर्नस्टार हा आक्षेपार्ह शब्द आहे का? हा आक्षेपार्ह शब्द नाही. हा एक असा शब्द आहे जो सामाजिक रुपाने स्वीकार्य नाही आहे.' तसंच तिने पुढे सांगितले की, 'आपल्या देशामध्ये पॉर्न स्टारला जेवढा सन्मान मिळतो. हे सनी लिओनीला विचारा.. ऐवढा सन्मान संपूर्ण जगामध्ये कोणालाच मिळू शकत नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : कोल्हापूर हादरले! माजी महिला सरपंचाचा खून, मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियकराला बेड्या

Pune : MHT-CET प्रकरणात नवा ट्विस्ट! प्रवेशासाठी लाखोंची मागणी? ऑडिओ क्लिप व्हायरल

Lose Belly Fat : गरम पाण्यात मिसळून प्या 'या' फळाचा रस, पोटाची ढेरी झपाट्याने होईल कमी

Maharashtra News Live Update: पुण्यातील व्यावसायिकाला लुबाडण्याचे प्रकरण, २ कर्मचाऱ्यांचे निलंबन

Pune Police: २ पोलिस अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन, पुणे पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT