Kangana Ranaut And Nishant Pitti Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: 'मी दुसऱ्याला डेट करतेय', निशांत पिट्टीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर कंगना रनौतने सोडलं मौन

Kangana Ranaut And Nishant Pitti: कंगना रनौतचा आयोध्येतील एक नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कंगनासोबत एक मिस्ट्री मॅन दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून फोटोत दिसणारी ही व्यक्ती आहे तरी कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Priya More

Kangana Ranaut Affair Rumors:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. नुकताच कंगना रनौतने अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यातील कंगनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. आता या सर्वानंतर कंगना रनौतचा आयोध्येतील एक नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कंगनासोबत एक मिस्ट्री मॅन दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून फोटोत दिसणारी ही व्यक्ती आहे तरी कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अशामध्ये कंगनाच्या अफेअरची देखील चर्चा सुरू झाली आहे. या सर्व अफवांनंतर कंगना रनौतने मौन सोडले आहे.

कंगना रनौत अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अयोध्येतील कार्यक्रमातील कंगना रनौतचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे. कंगना रनौतसोबत मिस्ट्री मॅन दिसत आहे. या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये कंगना रनौत मिस्ट्री मॅनसोबत खूपच खुश दिसत आहे. मिस्ट्री मॅन आणि कंगना रनौतचे हे फोटो समोर आल्यानंतर अभिनेत्रीच्या अफेअरच्या अफवा उडू लागल्या.

Kangana Ranaut Post

कंगना रनौतसोबत दिसणारा मिस्ट्री मॅन दुसरा तिसरा कोणी नसून EaseMyTrip चे सह-संस्थापक निशांत पिट्टी आहे. कंगना आणि निशांत यांचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा होत आहे. या चर्चांवर कंगना रनौतने मौन सोडत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कंगना रनौतने या सर्व बातम्या फेक असल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली की, 'मी दुसऱ्याला डेट करत आहे.'

कंगनाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर तिच्या अफेअरच्या अफवा असलेल्या बातमीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिने असे लिहिले आहे की, 'माझी मीडियाला नम्र विनंती आहे, कृपया चुकीची माहिती पसरवू नका. निशांतजी आनंदी विवाहित आहेत आणि मी दुसऱ्याला डेट करत आहे. योग्य वेळेची प्रतीक्षा करा, कृपया आम्हाला लाज वाटेल असं वागू नका. एकत्र फोटो क्लिक केल्यामुळे एका तरुणीचे नातं दररोज नवीन पुरुषाशी जोडले जाणं चांगलं नाही. कृपया असे करू नका.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT