Disha Patani Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

अशी कपडे का घालतेस..., Disha Patani चा स्टायलिश ड्रेसमधील व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Disha Patani Video: दिशा पाटनीने आपल्या नव्या लूकच्या माध्यमातून सर्वाचे लक्ष वेधू घेतले. या अवॉर्ड शोमध्ये सर्वांच्या नजरा दिशा पाटनीवरच खिळल्या होत्या. दिशा पाटनीचा या स्टायलिश ड्रेसमधील व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Disha Patani Uncomfortable With New Dress:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. दिशा पाटनी 'योद्धा' चित्रपटाच्या (Yodha Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटात दिशा पाटनीने उत्कृष्ट अभिनय केला असून तिचे कौतुक केले जात आहे. दिशा पाटनीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दिशा पाटनी नुकताच 'ग्राझिया यंग फॅशन अवॉर्ड्स 2024' या शोमध्ये सहभागी झाली होती. दिशा पाटनीने या शोमध्ये आपल्या जबरदस्त लूकमध्ये एन्ट्री केली.

दिशा पाटनीने आपल्या नव्या लूकच्या माध्यमातून सर्वाचे लक्ष वेधू घेतले. या अवॉर्ड शोमध्ये सर्वांच्या नजरा दिशा पाटनीवरच खिळल्या होत्या. दिशा पाटनीचा या स्टायलिश ड्रेसमधील व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या नवीन ड्रेसमध्ये दिशा पाटनी खूपच अस्वस्थ दिसत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. एकीकडे दिशा पाटनीच्या या हॉट लूकला तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे. तर दुसरीकडे दिशाला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

दिशा पाटनीचे ग्राझिया यंग फॅशन अवॉर्ड्स 2024 शोमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तिच्या या स्टायलिश लूकमधील व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दिशा पाटनीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या ड्रेसमध्ये खूपच अस्वस्थ दिसत आहे. दिशा पाटनीला अस्वस्थ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. दिशा या ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा लूक आवडला पण नेटकरी तिला चांगलेच ट्रोल करत आहेत.

दिशा पटानीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी दिशा पाटनीच्या या ड्रेसचे खूप कौतुक केले. दिशाला या ड्रेसमध्ये अस्वस्थ असल्याचे पाहून ट्रोल्सनी तिला टोमणे मारण्याची संधी सोडली नाही. दिशा पाटनीच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'तू या ड्रेसमध्ये किती अस्वस्थ दिसत आहेस'. दुसऱ्या युजरने लिहिले की, 'तू असा ड्रेस का घालता?' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'अशी कपडे का घालतेस.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT