Deepika Padukone Reel  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone ची 'जस्ट लुकिंग लाइक अ वाव' रील ठरली ब्लॉकबस्टर, व्ह्यूजमध्ये सलमानच्या 'Tiger 3' चा रेकॉर्ड मोडला

Deepika Padukone Reel Breaks Tiger 3 Trailer Record: बॉलिवूडच्या 'मस्तानी'ने देखील काही दिवसांपूर्वी 'जस्ट लुकिंग लाइक अ वाव' यावर रील्स तयार केली होती.

Priya More

Deepika Padukone Reel:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या चांगलीच चर्चेत आहे. दीपिकाचे फक्त भारतामध्येच नाही तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. दीपिकाच्या नवनवीन सोशल मीडिया पोस्टची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

अशामध्ये दीपिकाने काही दिवसांपूर्वी एक रील तयार केली होती. या रीलने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या रीलने व्ह्यूजच्या बाबतीत सलमान खानच्या 'टायगर ३' चित्रपटाच्या (Tiger 3 Movie) ट्रेलरचा देखील रेकॉर्ड मोडला आहे.

सध्या सोशल मीडियावर 'जस्त लुकिंग लाईक अ वाव' या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे. हा व्हिडीओ सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. दिल्लीच्या जस्मीन कौर या महिलेचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओने बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील वेड लावलं. या सेलिब्रिटींनी या व्हिडीओवर रील्स तयार करत सोशल मीडियावर पोस्ट केल्या. बॉलिवूडच्या 'मस्तानी'ने देखील काही दिवसांपूर्वी यावर रील्स तयार केली होती. दीपिकाच्या या रील या महिलेच्या व्हिडीओपेक्षा जास्त व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. दीपिकाच्या या रीलला आतापर्यंत 191 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ‘सो एलिगेंट, सो ब्यूटिफुल, जस्ट लुकिंग लाइक अ वॉव...’ असं म्हणत दीपिकाच्या रीलने तिच्या चाहत्यांचे मन जिंकलं.

दीपिका पादुकोणच्या या अप्रतिम रीलला नेटिझन्सकडून चांगली पसंती मिळत आहे. तिचा हा व्हिडीओ इतका वेळा पाहिला गेला आहे की त्याने सलमान खानच्या 'टायगर 3' च्या ट्रेलरच्या व्ह्यूजचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. दीपिकाच्या रीलवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटिझन्सला हा व्हिडिओ इतका आवडला आहे की आता हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ बनला आहे. दीपिकाच्या या रीलवर तिचे चाहते कमेंट करत आहेत आणि अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दीपिका पदुकोणच्या या व्हिडिओला आतापर्यंत 191 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ सलमान खानच्या 'टायगर 3' चित्रपटापेक्षा जास्त वेळा पाहिला जात आहे.

दरम्यान, दीपिका पदुकोणच्या वर्कफ्रेंटबद्दल सांगायचे झाले तर, तिचा 'फाइटर' हा चित्रपट २०२४ मध्ये प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती 'द इंटर्न' आणि 'प्रोजेक्ट के'च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. 'प्रोजेक्ट के'मध्ये अभिनेत्रीसोबतच प्रभास आणि अमिताभ बच्चनही मुख्य भूमिकेत आहेत. त्याचसोबत ती पती रणवीर सिंगसोबत 'सिंघम अगेन' चित्रपटामध्येही दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT