Bipasha Basu Daughter Devi Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bipasha Basu ची देवी १ वर्षांची झाली, मालदीवमध्ये बर्थडेनिमित्त केलं जंगी सेलिब्रेशन; क्यूट VIDEO पाहाच

Bipasha Basu Daughter Devi Birthday: बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर अनेकदा त्यांची मुलगी देवीचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Priya More

Devi Birthday Celebration Video:

बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) हे त्यांच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चांगलेच चर्चेत असतात.

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर अनेकदा त्यांची मुलगी देवीचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. बिपाशा आणि करणची मुलगी देवी एक वर्षांची झाली. या कपलने नुकताच मालदीवमध्ये देवीच्या पहिल्या वाढदिवासाचे (Devi First Birthday) जंगी सेलिब्रेशन केले.

बिपाशा आणि करणने मालदीवमध्ये देवीचा वाढदिवस साजरा केला. या कपलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर देवीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये हे कपल आपल्या मुलीसोबत इन्जॉय करताना दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावर कमेंट्स करत दोघांचे चाहते देवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी रविवारी म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला. यावेळी अभिनेत्रीने तिच्या मुलीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बिपाशा बसूने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये देवी खूपच क्यूट दिसत आहे. देवीने गुलाबी रंगाची सुंदर फ्रॉक घातली आहे. तर बिपाशाने सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

बिपाशा बसूने इन्स्टावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये देवी तिची आई बिपाशा आणि वडील करण सिंग ग्रोहव्हरसोबत पार्टीमध्ये एन्ट्री करताना दिसत आहे. त्याचसोबत हे कपल मालदीवच्या बीचवर देवीसोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे. बिपाशा बसूने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिपाशा बसूच्या या व्हिडिओवर चाहते जोरदार कमेंट करताना दिसत आहेत. काहींना बिपाशा बसूचा लूक खूप आवडला, तर काहींना तिची मुलगी देवीची फ्रॉक खूप आवडली. नेहमीप्रमाणे बिपाशाने यावेळी देखील आपल्या मुलीचा चेहरा दाखवला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT