Asha Bhosle And Mumtaz Dance Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

ओल्ड इज गोल्ड! आशा भोसलेंनी मुमताज यांच्यासोबत 'कोई शहरी बाबू...' गाण्यावर केला जबरदस्त डान्स, VIDEO होतोय व्हायरल

Asha Bhosle And Mumtaz Dance Video: आशा भोसले आणि मुमताज यांना डान्स करताना पाहून त्यांचे चाहते खूपच आनंदी झाले आहेत. दोघींही खूपच मनसोक्त डान्स करताना दिसत आहेत. दोघीही डान्स करत हा क्षण एन्जॉय करताना दिसत आहेत.

Priya More

Asha Bhosle And Mumtaz Viral Video:

बॉलिवूडच्या (Bollywood) ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) आणि अभिनेत्री मुमताज (Actress Mumtaz) सध्या चर्चेत आल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर (Social Media) त्यांचा एक व्हिडीओ ट्रेंड होत आहे. यामध्ये आशा भोसले यांनी मुमताज यांच्यासोबत डान्स केला आहे. 'कोई शहरी बाबू...' या गाण्यावर त्या डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओला चांगली पसंती मिळत असून चाहते त्यांचे कौतुक करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आशा भोसले आणि मुमताज यांनी 'कोई शहरी बाबू...' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. आशा भोसले यांनी देखील एक-एक डान्स स्टेप करत मुमताज यांच्यासोबत डान्स केला. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या वयातही एवढी एनर्जी पाहून सर्वजण त्यांच्या डान्सचे कौतुक करत आहेत.

आशा भोसले आणि मुमताज यांना डान्स करताना पाहून त्यांचे चाहते खूपच आनंदी झाले आहेत. दोघींही खूपच मनसोक्त डान्स करताना दिसत आहेत. दोघीही डान्स करत हा क्षण एन्जॉय करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून असे दिसत आहे की, घरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये या दोघी डान्स करत आहेत. या पार्टीला आलेले इतर सदस्य दोघींच्या डान्सचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद करताना दिसत आहेत.

आशा भोसले आणि मुमताज यांच्या प्रोफेशनबद्दल बोलायचे झाले तर, या दोघांनीही त्यांच्या काळात आपल्या कामाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. मुमताज यांनी 1960 आणि 1970 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'रोटी', 'दो रास्ते', 'आप की कसम', 'हरे रामा हरे कृष्ण', 'ब्रह्मचारी' यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने काम केले आहे. मुमताज यांनी त्यांच्या करिअरमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर, आशा भोसले यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 12 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्याची अनेक गाणी सुपरहिट ठरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनरनं २० गाड्यांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू, VIDEO समोर

Shocking : लग्न करण्यास नकार दिल्याने हत्या, प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरला विष देऊन संपवलं

Periods and Shravan : मासिक पाळीत श्रावणाचा उपवास करावा की नाही?, जाणून घ्या वैज्ञानिक कारणे

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

SCROLL FOR NEXT